Akola scrap Embezzlement news : भंगाराच्या विक्रीमध्ये अपहार करणं महापारेषणच्या अधिकाऱ्यांना चांगलंच अंगलट आलं आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील उपकेंद्रात अपहार करणाऱ्या आठ अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Those suspended include six engineers and two officers)
अकोला आणि कारंजा येथील उपकेंद्रातील भंगार हे कारंजा आणि अकोला उपकेंद्रात ठेवलं होतं. दोन्ही ठिकाणांहून आठ लाख ५२ हजार १० किलो भंगारापैकी चार हजार ७७५ किलो भंगार वळवण्यात आले. या भंगार विक्री प्रकरणात महापारेषणच्या आठ जणांना निलंबित करण्यात आले. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये सहा अभियंते आणि दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
महापारेषणच्या अमरावती विभागाचे मुख्य अभियंता जयंत विखे यांनी ही मोठी कारवाई केली आहे. कारवाई करणाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता रमेश वानखडे यांचादेखील समावेश आहे. २०१८ मध्ये, महापारेषणचे वीज उपकेंद्र अकोला आणि कारंजा सबस्टेशनमध्ये आठ लाख ५२ हजार १० किलो भंगार होते.
मात्र, २०२२ मध्ये भंगाराचे वजन केले असता चार हजार ७७५ किलो कमी भंगार भरल्याचे स्पष्ट झाले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर चौकशीची मागणी करण्यात आली, चौकशीत दोषी आढळल्यानंतर आठ जणांना निलंबित करण्यात आले. मात्र, काही प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत.
पोलिस चौकशी होण्याची शक्यता...
महापारेषणमध्ये अपहारप्रकरणी एवढी मोठी कारवाई करण्यात आल्याने हे प्रकरण पोलिसांत जाण्याची शक्यता आहे. उपकेंद्रातून चार हजार ७७५ किलो भंगाराच्या साहित्यात अपहार करण्यात आला. गैरव्यवहार झाल्याने कारवाई करण्यात आली. मात्र, तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात भंगार वळविण्यासाठी एका ट्रकची आवश्यकता असते. ते भरण्यासाठी किमान १० ते १२ मजूरही लागू शकतात. परंतु कुठेही याची नोंद आढळली नसल्याची माहिती आहे. त्यामुळेच या प्रकरणी पोलिस चौकशीची मागणी केली जात आहे.
निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये रमेश कृष्णराव वानखडे - कार्यकारी अभियंता, राहुल रामदास पाटील - अतिरिक्त कार्यकारी अभियंता, दत्ता दिनकर शेजोळे - अतिरिक्त कार्यकारी अभियंता, श्याम मेश्राम - अतिरिक्त कार्यकारी अभियंता, गोपाल दिलीप लहाने - उपकार्यकारी अभियंता, श्रीकांत टेहरे - उपकार्यकारी अभियंता, सुरेश पेटकर - उपव्यवस्थापक वित्त व लेखा, संजीत मेश्राम - उपव्यवस्थापक यांचा समावेश आहे.
आपसी वादातून तक्रार करण्यात आल्याची चर्चा...
भंगारात अफरातफर झाल्याची तक्रार अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या आपसी वादातून झाल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. या प्रकरणात अधिक चौकशी करण्याचीही गरज असल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.