Akola News: वर्ष झाले; महानगरपालिकेवर प्रशासक राज कायम, इच्छुकांचा तयारीला ब्रेक !

Municipal Corporation Election: प्रशासक म्हणून आयुक्त कविता द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली.
Akola Municipal Corporation
Akola Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Akola Municipal Corporation Election News: महागनरपालिकेची मुदत संपून आज १२ महिन्यांचा कालावधी उलटला, तरी अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नाही. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावरील सुनावणी लांबली आहे. सुनावणी एक-एक महिना प्रत्येक वेळी लांबणीवर पडत आहे. त्यामुळे वर्ष उलटले तर मनपावर प्रशासक राज कायम आहे.

दिवाळीपूर्वी निवडणुका घेणे अशक्य असल्याने प्रशासक राज वाढणार आहे. अकोला महानगरपालिकेची मुदत आजच्या दिवशी, ८ मार्च २०२२ रोजी संपली होती. त्यानंतर मनपावर प्रशासक म्हणून आयुक्त कविता द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली. त्याला १२ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच नव्याने प्रभाग रचना व मतदार याद्या तयार करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या आदेशाने मनपा प्रशासनाकडून तीन वेळा करण्यात आले.

अद्याप निवडणुका जाहीर झाल्या नाहीत. दरम्यान, प्रभाग आरक्षण सोडतही काढण्यात आली होती. ओबीसीशिवाय ही आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यानंतरही सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय न लागल्याने पुढील आदेशापर्यंत नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकला नाही. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर सत्ताधारी भाजपकडून मनपा निवडणुकीच्या तयारीला गती देण्यात आली होती.

आयोगाकडून अकोला (Akola) मनपा प्रशासनाला प्रभाग रचना करण्याबाबतचे पत्रही नव्याने पाठविण्यात आले होते. मात्र, अद्याप प्रभाग रचना कशी करायची, याबाबतचे पत्र प्रशासनाला आयोगाकडून मिळाले नाही. सर्वोच्च न्यायालयातील ओबीसीची याचिकाही प्रलंबित आहे. त्यामुळे आता दिवाळीपूर्वी निवडणूक होणे अशक्य असल्याने प्रशासक राज किमान नोव्हेंबरपर्यंत वाढणार असल्याची शक्यता आहे.

Akola Municipal Corporation
Akola : ‘सरकार समस्या क्या सुलझाए`, सरकारही एक समस्या है’, शेतकरी संघटना आक्रमक !

मनपा निवडणुकीचा (Election) कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन इच्छुकांनी गेले वर्ष-दोन वर्षांपासून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली होती. मात्र, वर्ष उलटूनही निवडणूक कधी होणार याबाबतचा निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे इच्छुकांच्या तयारीला ब्रेक लागला आहे.

तत्कालीन मनपातील (Municipal Corporation) सत्ताधारी व आता राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने इच्छुकांकडून अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली होती. इतर पक्षांनीही निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी त्यांच्या स्तरावर सुरू होती. मात्र, आता निवडणुका कधी होणार याबाबतच अनिश्चितता असल्याने सर्व तयारीला ‘ब्रेक’ लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com