Campaigner : 'मिस्टरां'च्या प्रचारात 'मिसेस'ची दमछाक...; अकोल्यात राजकारण तापलं

Lok Sabha Campaign : अकोला लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक चुरशीची लढत होत आहे. या ठिकाणी पतीच्या प्रचारासाठी पत्नी मैदानात पदर खोचुन होत्या. अनुप धोत्रे यांच्या आई आणि आंबेडकर यांचा मुलगा प्रचारात दिसून आला.
Samiksha Dhotre, Dr.Rekha Patil, Prof. Anjali Ambedkar
Samiksha Dhotre, Dr.Rekha Patil, Prof. Anjali AmbedkarSarkarnama

Akola Lok Sabha Election 2024 : अकोला लोकसभा मतदार संघात काँग्रेस नेते डाॅ. अभय पाटील, वंचित नेते प्रकाश आंबेडकर, भाजप नेते अनुप धोत्रे या तिघांच्या प्रचारात त्यांच्या मिसेसचा सहभाग मोलाचा होता. प्रचारात मोलाची भूमिका या तीनही बड्या नेत्यांच्या पत्नींची होती. डाॅ. अभय पाटील यांच्या प्रचाराची धुरा आणि नेते व कार्यकर्ते व एकूणच प्रचाराच्या नियोजनाची जबाबदारी स्त्री रोगतज्ञ डाॅ. रेखा पाटील यांच्या खांद्यावर होती. डाॅ. रेखा पाटील यांनी स्वतःचे क्लिनिक तूर्तास बाजूला ठेवत प्रचारात उडी घेतली होती.

महिला काँग्रेस च्या पदाधिकारी असो की, इतर ठिकाणी प्रचार असो डाॅ. रेखा पाटील यांनी अगदी प्रत्येक ठिकाणी स्वतः पुढाकार घेतला. काँग्रेस उमेदवार डाॅ. अभय पाटील यांच्या पेक्षा त्यांच्या पत्नी डाॅ. रेखा पाटील या अधिक आक्रमक आहे. त्यांनी काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांसोबत अभय पाटील यांचा जोरदार प्रचार केला. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Samiksha Dhotre, Dr.Rekha Patil, Prof. Anjali Ambedkar
Kolhapur Loksabha : '... दिशाभूल करू नका', संजय मंडलिकांचे शाहू महाराजांना खुल्या चर्चेचे आवाहन

भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी त्यांची आई सुहासीनी धोत्रे आणि पत्नी समिक्षा यांनी निवडणुकीत उडी घेतली आहे. सुहासीनी धोत्रे यांना संजय धोत्रे यांच्या प्रचाराचा अनुभव असुन समिक्षा मात्र यंदा पहिल्यांदाच निवडणुक रिंगणात उतरल्या आहेत. त्या घरोघरी प्रचारात व्यस्त असुन महिलांना सोबत घेत शहरातील काही भागात त्यांनी मतदारांच्या घरोघरी जात प्रचार त्यांनी केला. भाजपच्या महिला आघाडीच्या सोबत प्रचारात त्यांनी भाग घेत अनुप धोत्रे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. लहान मुले घरी ठेवत समिक्षा धोत्रे यानी रोज तब्बल दहा ते बारा तास पती अनुप यांचा प्रचार केल्याची माहिती आहे. अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शाह यांचा नुकताच दौरा झाला होता. त्यात महिलांची संपुर्ण जबाबदारी ही समिक्षा धोत्रे यांनी सांभाळली होती.

वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर अकोला लोकसभा निवडणुकीत प्रचारापेक्षा राज्यातील इतर ठिकाणी प्रचाराची जबाबदारी होती. ते इतर उमेदवार निश्चिती आणि राज्यातील ज्येष्ठ व इतर नेत्यांच्या भेटीगाठीत व्यस्त असल्याने अकोल्यात संपुर्ण प्रचाराची जबाबदारी ही नुकत्याच निवृत्त झालेल्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी सांभाळली. गेल्या वर्षापासुन त्यांनी पुणे सोडुन अकोल्यात तळ ठोकला होता. त्यामुळे त्यांना अकोल्यातील कार्यकर्ते, जिल्हा परिषदेतील वंचितचे नेते, इतर राजकीय नेते मंडळी, पत्रकार आणि स्थानिक राजकारणाची यांची पुर्ण जाणीव होती. प्रा.अंजली आंबेडकर यांनी अनेक प्रचारसभांना संबोधित केले. प्रचार रॅलीत त्या स्वतः सहभागी होत्या.

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात यांनी देखील अकोल्यात पहिल्यांदाच प्रचारात स्वतः उडी घेतली. अंजली आंबेडकर व सुजात आंबेडकर या दोघांनी वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचाराची संपुर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत प्रकाश आंबेडकर यांचा प्रचार सांभाळला. प्रचाराचे नियोजन पासुन ते प्रचार, वंचितचा जाहिरनामा यात अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी महत्वाची भूमिका बजावली. अकोल्याच्या कडक उन्हात अगदी प्रचार सभा गाजवित त्यांनी वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांचा प्रचार केला.

Samiksha Dhotre, Dr.Rekha Patil, Prof. Anjali Ambedkar
Dindori constituency 2024 : राष्ट्रवादीचा सडेतोड प्रश्न, 'अहो, भारतीताई पाच वर्षात कांदा प्रश्नावर काय केले'..?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com