Kolhapur Loksabha : '... दिशाभूल करू नका', संजय मंडलिकांचे शाहू महाराजांना खुल्या चर्चेचे आवाहन

Loksabha Election :लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक एकोप्याचे विचार, त्यांनी केलेली विकासकामे आणि त्याचा आपल्याला लाभलेला वारसा, याबाबत बोलण्यापेक्षा राजर्षींच्या गादीचा मान राखून आपण कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने काय पावले उचलली, असा सवाल मंडलिक यांनी उपस्थित केला.
Shahu Maharaj Sanjay Mandlik
Shahu Maharaj Sanjay Mandlik sarkarnama

Kolhapur Political News : कोल्हापूर मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. सतेज पाटील यांनी शाहू महाराजांच्या प्रचाराची धुरा संभाळली आहे. संभाजीराजेदेखील प्रचारात सक्रिय आहेत. महायुतीकडूनदेखील जोरदार प्रचार सुरू आहे. उमेदवार संजय मंडलिक यांनी नाव न घेता शाहू महाराज, सतेज पाटील satej Patil यांना टार्गेट केले आहे.

'उमेदवाराने सातत्याने भूतकाळातल्या आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामाचे श्रेय स्वतः घेऊन जनतेची दिशाभूल करू नये. याचे भान निवडणुकांचा प्रचंड अनुभव असणाऱ्या त्यांच्या प्रवक्त्यांनीही ठेवावे. आपण सांगू त्याच पद्धतीने प्रत्येकाने वागावे, अशा हुकूमशाही थाटात प्रवक्ते वावरत आहेत', असा टोलाही महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक Sanjay Mandlik यांनी सतेज पाटील व शाहू महाराज यांचे नाव न घेता लगावला.

Shahu Maharaj Sanjay Mandlik
Chhagan Bhujbal News : 'शिरूरच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांचा फोन...', अमोल कोल्हेंच्या दाव्यावर छगन भुजबळांचे प्रत्युत्तर

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक एकोप्याचे विचार, त्यांनी केलेली विकासकामे आणि त्याचा आपल्याला लाभलेला वारसा, याबाबत बोलण्यापेक्षा राजर्षींच्या गादीचा मान राखून आपण कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने काय पावले उचलली, याचा लेखाजोखा आता लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहिल्यानंतर मांडण्याची वेळ आली आहे. तेव्हा सातत्याने प्रवक्त्याआडून वारसा न सांगता समोर या, जाहीरपणे कोल्हापूरच्या विकासावर थेट चर्चा करू, अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे Congress उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना चर्चेचे जाहीर निमंत्रण दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापुरात शनिवारी (ता. २७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीसाठी आयोजित बैठकीनंतर मंडलिक पत्रकारांशी बोलत होते. खासदार मंडलिक म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार दिल्लीत पोहोचवायला आम्ही कटिबद्ध आणि समर्थ आहोत. राजर्षीं शाहू महाराज ही आमचीदेखील अस्मिता आहे. ती आम्ही जपूच पण अस्मिता जपताना आपल्या कर्तव्यात कुठे कसूर होणार नाही, याचे भानही प्रतिस्पर्थी उमेदवारांनी राखले पाहिजे. नुसत्याच वारसा हवक्कावर दावा केला जातो आहे. आपल्या ५० वर्षांतील कामाचा लेखाजोखा काही मांडला जात नाही.

शाहू महाराजांना खुल्या चर्चेचे आवाहन

गादीच्या अपमानाचा कांगावा केला जात आहे; पण प्रत्यक्ष जे उमेदवार आहेत, त्यांनी गादीचा लौकिक वाढावा. राजर्षी शाहूंचा कृतिशील वारसा जपावा, यासाठी काय केले? गेल्या ५० वर्षांत काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांनी विविध क्षेत्रांत काय कार्य केले आणि खासदार म्हणून आपण केलेले काम याबाबत खुली चर्चा करूया, असे आवाहन दिले.

(Edited By Roshan More)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com