Anup Dhotre: अनुप धोत्रे यांच्या रूपाने भाजपची युवा उमेदवाराला पसंती; वडिलांच्या जागी मुलाला उमेदवारी

Akola Lok Sabha Elections 2024: बोलण्यात, वागण्यात, जनसंपर्क ठेवण्यात वडिलांचाच ठसा असलेले अनुप धोत्रे यांच्या उमेदवारीनं भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Anup Dhotre
Anup DhotreSarkarnama

Akola: लोकसभा निवडणुकीसाठी (lok sabha elections 2024) भाजपकडून (bjp) महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या या यादीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठसा ठळकपणे जाणवत आहे.

सलग पाचव्यांदा अकोला लोकसभा हा गड अभेद्य ठेवण्यासाठी भाजपने विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे (anup dhotre) यांच्या माध्यमातून रणशिंग फुंकले आहे. बोलण्यात, वागण्यात, जनसंपर्क ठेवण्यात वडिलांचाच ठसा असलेले अनुप धोत्रे यांच्या उमेदवारीनं भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपकडून मिळालेली उमेदवारी ही वडिलांच्या पक्षनिष्ठेचे फळ आहे. कार्यकर्त्यांच्या पाठबळाने व जनतेच्या विश्वासाने सलग पाचव्यांदा अकोला लोकसभेचा गड आम्ही काबीज करू, असा विश्वास उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनुप धोत्रे यांनी यापूर्वी कोणतीही निवडणूक लढविलेली नसून लोकसभेच्या माध्यमातून पहिलीच निवडणूक ते लढवत आहेत. काही महिन्यांपासून ते अकोला लोकसभा निवडणूक प्रमुख आहेत. ऑक्टोबर २०२३ पासून भाजपच्या सोशल मीडिया विभागाचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघस्तरीय महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन त्यांनी यापूर्वी केले आहे. या शिबिरांतून जवळपास ३५ हजार रुग्णांची नोंदणी व तपासणी करण्यात आली होती.

Anup Dhotre
Raju Patil Vs Shrikant Shinde: निवडून यायचं असेल तर त्यांनी सावरून घ्यायला पाहिजे; पाटलांचा शिंदेंना खोचक सल्ला

२०१४ व २०१९ मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी बूथ, नगर व वार्डस्तरांवर बैठका घेऊन त्यांनी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी योगदान दिले आहे. मुख्यमंत्री चषकाचे आयोजन करून त्यात मोठ्या प्रमाणात युवकांना सहभागी करून घेतले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सोशल मीडिया वॉररूमच्या माध्यमातून मतदान संपर्क अभियान प्रभावीपणे राबविल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे कसब निश्चितच कामाला येऊ शकेल.

प्रयोगशील शेतकरी

प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी (विशेषतः कापूस उत्पादक) म्हणून अनुप धोत्रे यांची जिल्ह्यात ओळख आहे. अकोला येथील कृषी विज्ञान केंद्राचे सचिव म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. ग्वाल्हेर येथील जीआयसीटीएस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे ते सचिव असून, त्या माध्यमातूनही त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. ते अभिनव बाल शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. अकोला येथील निळकंठ सहकारी सूतगिरणीचे संचालक आहेत.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com