Akola News : पाहिजे होते २५ कोटी, सध्या मिळाले फक्त सव्वा पाच कोटी, तोकड्या निधीमुळे होणार आमदारांची कसरत !

MLA : प्रत्येकी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Randhir Sawarkar, Nitin Deshmukh, Amol Mitkari and Prakash Bharsakale.
Randhir Sawarkar, Nitin Deshmukh, Amol Mitkari and Prakash Bharsakale.Sarkarnama
Published on
Updated on

Seven MLAs got a fund of 5 crore 25 thousand : आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सन् २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी आमदारांना विकास कामे करता यावी, यासाठी शासनामार्फत प्रत्येकी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. एका आमदाराला ७५ लाखांचा निधी मिळाल्याने जिल्ह्यातील एकूण सात आमदारांना ५ कोटी २५ हजारांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे आमदारांना विकास कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (The way has been cleared for MLAs to carry out development works)

मतदारसंघातील छोटी-मोठी कामे करता यावी, म्हणून प्रत्येक आमदाराला शासनाकडून निधी दिला जातो. यात पायवाटा, रस्ते, छोट्या गल्ल्या, व्यायामशाळा, व्यायामशाळेची उपकरणे, जलवाहिन्या, शाळा दुरुस्ती अशी छोटी-मोठी कामे करता येतात. आमदारांनी सुचविलेल्या कामांना जिल्हा नियोजन विभागाकडून मंजुरी दिली जाते आणि कामे प्रत्यक्ष अमलात आणली जातात.

छोटी-छोटी कामे करून मतदारांना खूश करण्याकरिता आमदार निधीचा आमदारांना उपयोग होतो. आमदार निधीतून कामे केल्यावर त्या-त्या भागांमध्ये आमदारांकडून फलक लावून जाहिरातबाजी केली जाते. पुढील निवडणुकीत मतांसाठी या निधीचा चांगला उपयोग होतो. निवडून आल्यास आमदार निधीतून ही कामे करीन, असे आश्वासन प्रचाराच्या काळात दिली जातात.

काही आमदार तर गल्लोगल्ली आपल्या आमदार निधीतून केलेल्या कामांची जाहिरात करीत असतात. दरम्यान सन् २०२३-२४ या वर्षात आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करता यावी, यासाठी प्रत्येकी ७५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. जिल्ह्यातील एका आमदारासाठी सदर निधी असल्याने सात आमदारांचा ५ कोटी २५ लाखांचा निधी नियोजन विभागाला मिळाला आहे.

Randhir Sawarkar, Nitin Deshmukh, Amol Mitkari and Prakash Bharsakale.
Akola District News : अकोला लोकसभा निवडणूक प्रमुखाची जबाबदारी ‘या’ खासदार पुत्रावर !

विकास निधी खात्यात जमा..

नियोजन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा, अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिष पिंपळे, बाळापूर मतदारसंघाचे (Nitin Deshmukh) आमदार नितीन देशमुख, विधान परिषदेचे सदस्य (Amol Mitkari) अमोल मिटकरी व विधान परिषदेचे सदस्य वसंत खंडेलवाल यांना विकास कामांसाठी प्रत्येकी ७५ लाखांचा निधी मिळाला आहे.

प्रत्येकी ५ कोटीचा निधी..

राज्यातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी मिळणारा आमदार निधी पाच कोटी रुपये करण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यामुळे गत वर्षापासून आमदारांना एका वर्षात विकास कामांवर खर्च करण्यासाठी प्रत्येकी ५-५ कोटी रुपये मिळत आहेत.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com