Akola District Bacchu Kadu's Prahar News : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि अकोला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू आपला पक्ष वाढवण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. अगदी विदर्भाच्या बाहेर उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात ते पाय रोवू बघत आहेत. अशा परिस्थितीत विदर्भात आणि त्यातल्या त्यात ते स्वतः पालकमंत्री राहून चुकलेल्या जिल्ह्यात त्यांचे महत्वाचे पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत. (Big shock for Bachu Kadu)
बच्चू कडू यांनी अकोल्यात प्रहार जनशक्ती पक्ष बळकट करण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. प्रहारच्या अकोला जिल्ह्यातील पहिल्या जिल्हा परिषद सभापती ठरलेल्या स्मृती गावंडे यांचे पती निखिल गावंडे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख निखिल गावंडे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोट तालुका प्रमुख तुषार पाचकोर तसेच संजय बुध यांनी सहकाऱ्यांसह काल (ता. १५) जून रोजी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचितच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा जाहीर प्रवेश झाला.
प्रहार जनशक्ती पक्षाने अकोट विधानसभा मतदारसंघावरच अधिक लक्ष केंद्रित केले असताना प्रहारचे उपजिल्हाप्रमुख निखिल गावंडे, तालुकाप्रमुख तुषार पाचकोर तसेच जिल्हा अध्यक्ष प्रहार शेतकरी आघाडीचे जिल्हाप्रमुख संजय बुध, लोतखेळचे उपसरपंच विशाल नागरे यांनी वंचितमध्ये प्रवेश केल्याने प्रहारला जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
पक्ष प्रवेश करताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा ओबीसी नेते ॲड. संतोष रहाटे, बंटी पाटील गावंडे, हिरा सरकटे व सचिन सरकटे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘वंचित’ला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी दिले होते सभापतिपद..
अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला होता. त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाकडून स्मृती गावंडे यांना सभापतिपद देऊन वंचितवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून झाला होता. त्यानंतर प्रहार व वंचित यांच्यात अनेक आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या होत्या. आता त्याच सभापतींच्या पतीने वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतल्याने प्रहारला मोठा धक्का बसला आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघातच फूट..
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे हे अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी (Election) तयारी करीत आहेत. त्याच मतदारसंघात ‘प्रहार’मध्ये फूट पडल्याने पक्ष नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.