Akola riots : कॅमेऱ्यात जे दिसले, त्यांना अटक करून उपयोग नाही; त्याच्या मागे कोण, हे शोधा…

Prakash Ambedkar : अकोल्याची दंगल ही मॅन्युअल आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

Prakash Ambedkar on Akola Riots : अकोला येथे शनिवारी (ता. १३) रात्री दंगल झाल्यानंतर संपूर्ण शहर दहशतीत आलं. नंतर शेवगाव आणि त्यानंतर त्र्यंबकेश्‍वर येथेही तसाच प्रकार घडला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं आहे. अकोल्याची दंगल ही मॅन्युअल आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. (The Chief Minister had promised for action)

अकोल्यातील दंगल नियंत्रणात आणण्यासाठी डीजी अमरावती आले, हेच सर्वकाही सांगून जाते. जिल्हा पोलिस अधीक्षकांना आम्ही जी कारवाई करण्यासाठी सांगितली होती, ती झाली नाही त्यामुळे काहींचे मनोबल वाढले आणि दंगल उसळली. पोलिसांनी दंगल रोखण्यासाठी वेळेत प्रयत्न करायला हवे होते, ते केले नाही. त्यामुळे पुढील सर्व अनर्थ घडला, असे आंबेडकर म्हणाले.

नाशिक एसआयटीने महिन्यांपूर्वी अहवाल दिला होता. त्यात ज्यांची नावे आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, ही आमची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. पण ते पाळले नाही. अकोल्यानंतर शेवगावातही दंगल उसळली. त्या प्रकरणातील तपास अधिकारी हे स्वत: बंदी असलेल्या एका संघटनेशी संबंधित आहे. त्यामुळे चौकशी काय होणार, याचा अंदाज तेव्हाच आला असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

यंत्रणेने विनाकारण अनेक चुकीच्या अटक घडवल्या आहेत, हेसुद्धा मुख्यमंत्र्याच्या (Chief Minister) निदर्शनास आणून दिले आहे. दंगल वाढवण्याचा प्रयत्न होतो आहे. जोपर्यंत तेथे कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत या दंगली थांबणार नाहीत. कॅमेऱ्यात दिसणाऱ्यांना अटक केली जात आहे आणि आरोपींचे आकडे फुगवण्याचे काम सुरू आहे. याचा काही उपयोग होणार नाही. कॅमेऱ्याच्या मागे जे आहेत, त्यांना अटक होणं गरजेचं आहे.

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar : आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून आंबेडकरांचा ठाकरेंना सल्ला; म्हणाले, "महिन्यानंतर..."

अकोला (Akola) दंगलीत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. ती व्हायरल झाल्यानंतर दंगल पेटली आणि हे जाणीवपूर्वक झाल आहे. संबंधितांना आवाहन आहे की, अशा पसरवू नका. कारण त्यानंतर जे होतं, त्याला तेथील मुस्लिम बळी पडतात. असले प्रकार करून निवडणुकांचा निकाल बदलेल, असं कुणाला वाटत असेल, तर त्यांनी कर्नाटकचे (Karnataka) निकाल बघावे, असा इशाराही ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी कुणाचेही नाव न घेता दिला आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com