Akola
AkolaSarkarnama

Akola Riots News: क्लिप कुणी व्हायरल केली, मास्टरमाईंड कोण? पोलिसांसमोरील मोठे आव्हान...

Akola Police News: राजकीय हस्तक्षेप न होता या प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
Published on

Akola Riots Analysis News : अकोला जुने शहरात दोन समाजांमध्ये उद्भवलेल्या वादाच्या घटनेत सोशल मीडियामध्ये काही क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यामध्ये काही समाजाच्या भावना दुखावणारी घटना होती. त्यातून एक गट आक्रमक झाला. त्यानंतर ही घटना घडली. (Some of the clips went viral on social media)

क्लिप कुणी व्हायरल केली, त्यामागे त्याचा उद्देश काय होता, याचा तपास करण्याचे आव्हान अकोला पोलिसांपुढे आहे. अलीकडे सायबर गुन्हे वाढले आहेत. अशा वेळी तपास यंत्रणांच्या हातात खूप काही बाबी असतात. ही क्लिप कुणी व्हायरल केली, यामागे मास्टरमाईंड कोण होता, त्याचा उद्देश काय होता, या बाबींच्या खोलात तातडीने गेले पाहिजे.

पोलिस यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप न होता या प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. जुने शहरातील वादावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. यामागे भाजपचा हात असल्याचा आरोपही काही नेत्यांनी केला. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आमदार अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) मागणीनंतर अकोला पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. अशा परिस्थितीत पोलिसांपुढे शनिवारच्या घटनेच्या चौकशीचे आव्हान अधिकच कठीण झाले आहे. आता पोलिस हे आव्हान कसे आणि किती लवकर पूर्ण करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Akola
Akola BJP News : अंधारेंच्या नावावर एकमत, पण अग्रवालांच्या नावाला विरोध करणारे ते दोन डॉक्टर कोण?

पोलिस कुमक उशिरा पोहोचण्याची कारणे काय?

घटनेच्या दिवशी अकोला (Akola) जुने शहरात दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकले. दगडफेक झाली. रात्री १२.३० वाजता सुरू झालेला हा वाद १.३० वाजेपर्यंत धुमसत होता. तोपर्यंत पोलिस (Police) कुमक या परिसरात पोहोचली नव्हती, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अशा परिस्थितीत पोलिसांच्या उशिरा पोहोचण्यामागील कारणांचाही शोध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

नागरिक अद्यापही तणावात..

जुने शहरातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, शनिवारच्या घटनेने नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भिती अद्याप कायम आहे. त्यामुळे या परिसरात अद्यापही तणावपूर्ण शांतता आहे. नागरिकांच्या मनातील ही भिती काढून सुरक्षेबाबत आश्‍वस्त करण्याचे काम परिसरातील पुढाऱ्यांसोबतच (Political Leaders) पोलिस यंत्रणेलाही करावे लागणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com