Akola BJP News : अंधारेंच्या नावावर एकमत, पण अग्रवालांच्या नावाला विरोध करणारे ते दोन डॉक्टर कोण?

Vijay Agrawal : विजय अग्रवाल यांच्या नावावर सहमती झाल्याने ते पदावर कायम राहणार.
Ganesh Andhare and Vijay Agrawal
Ganesh Andhare and Vijay AgrawalSarkarnama

Akola BJP's District Cheif Change News : भाजपच्या संघटनात्मक बांधणीची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा व शहरासाठी अध्यक्ष निवडले जाणार आहेत. महानगराध्यक्षपदासाठी विजय अग्रवाल यांच्या नावावर सहमती झाल्याने ते पदावर कायम राहणार हे जवळपास निश्चित झाले आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी सर्वांनी एकमताने गणेश अंधारे यांचे नाव पुढे केले. (All unanimously nominated Ganesh Andhare for the post of District President)

याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी ही दोन्ही नावे प्रदेशकडे पाठविण्यात आली असून, लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांची प्रदेश कार्यकारिणीत सरचिटणीस पदावर वर्णी लागली आहे. त्यामुळे अकोला जिल्हाध्यक्ष पदावर नव्याने नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी पक्षातील काही दिग्गजांची नावे चर्चेत होती.

भाजपने धक्कातंत्राचा वापर करीत गणेश अंधारे यांचे नाव पुढे करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. भाजप कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत गणेश अंधारे यांचे नाव सर्व सहमतीने पुढे करण्यात आले. त्यासोबतच विजय अग्रवाल यांच्या नावालाही बहुमताने सहमती देण्यात आली. या बैठकीला विदर्भ विभाग संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, आमदार हरीश पिंपळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील, अनुप धोत्रे, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, ॲड. मोतीसिंग मोहता, विजय मालोकार, सिद्धार्थ शर्मा, श्रावण इंगळे, गिरीश जोशी, माधव मानकर, डॉ. अशोक ओळंबे, डॉ. किशोर मालोकार, शंकरराव वाकोडे आदींसह सर्व मंडळ अध्यक्ष, मोर्चा, आघाडी सेलचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Ganesh Andhare and Vijay Agrawal
Akola riots : ठाकरे गटाने घेतली मृत विलास गायकवाडच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी…

अग्रवालांच्या नावाला दोन डॉक्टरांचा विरोध..

भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्याकडेच महानगराध्यक्षपद कायम ठेवण्याबाबत भाजपच्या संघटनात्मक बैठकीत चर्चा झाली. यावेळी शहर कार्यकारिणीसाठी प्रदेशकडून नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. बहुतांश सर्वांनीच अग्रवाल यांना कायम ठेवण्याचा सूर आवळला. मात्र, बैठकीला उपस्थित असलेल्या दोन डॉक्टरांनी मात्र अग्रवाल यांच्या नावाला विरोध केला असल्याची माहिती आहे. डॉ. किशोर मालोकार आणि डॉ. अशोक कोळंबे हे ते दोन डॉक्टर असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोण आहेत गणेश अंधारे ?

भाजपच्या (BJP) दक्षिण मंडळाचे अध्यक्ष गणेश अंधारे हे मूळचे (Congress) काँग्रेसचे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अकोला (Akola) पंचायत समिती सदस्य म्हणून ते निवडून आले होते. त्यानंतर त्यांना भाजपने अकोला पंचायत समितीचे उपसभापतिपदही दिले होते. महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) हद्दवाढीनंतर गणेश अंधारे यांचा खडकी परिसर मनपा क्षेत्रात आला. आता ते भाजपच्या दक्षिण मंडळाचे अध्यक्ष आहेत. आमदार रणधीर सावरकर यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. म्हणून आमदार सावरकरांचे वारसदार म्हणून जिल्हाध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावालाच सर्व सहमतीने पसंती देण्यात आली आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com