Akola West Constituency : अकोला पश्चिमची पोटनिवडणूक राज्यासाठी ठरणार ‘लिटमस टेस्ट'

Vanchit Bahujan Aghadi : निवडणूक घोषित न झालेल्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभा करण्याची घोषणाही केली.
Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar NewsSarkarnama
Published on
Updated on

सचिन देशपांडे -

Akola News : 'इंडिया' आघाडीचे दार अद्याप उघडले नसताना मंगळवारी वंचित बहुजन आघाडीने निवडणूक घोषित न झालेल्या अकोला पश्चिम या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करण्याचे घोषित केले. हे करताना काँग्रेसनेते सुनील केदार यांच्या जेलवारीमुळे रिक्त झालेल्या सावनेर या जागेवर वंचितने चुप्पी साधली आहे.

अकोला पश्चिम हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी पोटनिवडणूक झाली तर, ती राज्यासाठी 'लिटम्स टेस्ट' असेल. एकीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीला थेट कोंडित पकडण्याची तयारी वंचितने केली आहे, तर दुसरीकडे या निवडणुकीत भाजप (BJP) विजय झाला तर, भाजपची लाट राज्यात कायम आहे, हे दाखविण्याच्या प्रयत्नांना लगाम लावण्यासाठी 'वंचित'कसा महत्त्वाचा घटक आहे, हे दाखवून देण्याची तयारी सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Ambedkar News
Radhakrishna Vikhe : 'संजय राऊतांनी आमची काळजी करू नये, त्यांच्या विरोधात..' ; विखेंचा पलटवार!

मुळात जिथे निवडणूकच घोषित झाली नाही तिथे थेट आम्ही उमेदवार उभा करणार, हा केवळ राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीचा नाही. हा बाण सोडताना वंचितने महाविकास आघाडी, शिवसेना (उबाठा गट) आणि देशातील इंडिया आघाडीला विचारात घेतले नसल्याचे एकतर्फी घोषणेतून दाखविले आहे.

वंचितने केवळ अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार उभा राहील, असे घोषित केले. पण, दुसरीकडे काँग्रेसनेते सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या जेलवारीमुळे रिक्त झालेल्या रिक्त सावनेर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे वंचितने दुर्लक्ष केले की सावनेर मतदारसंघ काँग्रेसला सोडला ? असा प्रश्न उपस्थित होतो.

भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर अकोला (Akola) पश्चिम मतदारसंघात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. वंचितने आज अकोला पश्चिम लढणार असल्याचे घोषित करीत शर्मा परिवाराच्या सहानुभूतीच्या लाटेला अप्रत्यक्ष विराम दिला आहे.

इतकेच नाही तर वंचितने या मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचे निश्चित करीत राज्यात नवाच संदेश दिला आहे. विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त हा संदेश भाजपविरोधात लढण्याचा तर आहेच, त्याचबरोबर महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी आहे.

Prakash Ambedkar News
Shirdi Constituency : शिर्डीची जागा शिंदेंच्या सेनेकडे? घोलपांच्या सक्रियतेने देवळालीत चर्चांना उधाण

अकोला पश्चिमची जागा का महत्त्वाची का?

आमदार गोवर्धन शर्मा यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा विजय मिळवला. 3 नोव्हेंबर रोजी गोवर्धन शर्मा यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यामुळे अकोला पश्चिम हा मतदारसंघ रिक्त आहे. तिथे पोटनिवडणुकीची शक्यता आहे. शर्मा परिवाराला पुढे करत भाजप येथे सहानुभूतीच्या लाटेचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे.

या मतदारसंघात गोवर्धन शर्मा यांचा मुलगा कृष्णा शर्मा यास तिकीट दिले जाऊ शकते. त्याचबरोबर या मतदारसंघात भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल इच्छुक आहेत. अशा परिस्थितीत निवडणूक घोषित न झालेल्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवार देण्याची व्यूहरचना आखली आहे. त्या व्यूहरचनेत कोण अडकतो, हे पाहण्यासारखे आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com