Akola News : दिवाळीचा सण म्हणजे आनंदाची पर्वणी. अशात स्थानिक व्यावसायिकांकडुन खरेदी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलय. यासाठी ‘व्होकल फॉर लोकल’ अभियान राबविण्यात येतय. अकोला विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी या अभियानाला प्रतिसाद देत शहरातील स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांकडुन दिवाळीची खरेदी केली.
दिवाळीनिमित्त अकोला शहरात ग्रामीण भागातून दरवर्षी अनेक लहान व्यावसायिक येतात. रस्त्याच्या कडेला दुकानं थाटत ते आपल्या जवळील मालाची विक्री करतात. पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर यंदा या छोट्या दुकानदारांना मिळणारा प्रतिसादही वाढलाय. (Akola's MLC Amol Mitkari Responds Vocal for Local Campaign by Doing Diwali Shopping at Local Market With Family)
अशात आमदार अमोल मिटकरी यांनीही आपल्या परिवारासह बाजारात येत दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आमदार मिटकरी यांनी ‘हॉकर्स’साठी रास्ता रोको आंदोलन केलं होतं. त्याच परिसरात जात त्यांनी खरेदी केल्यानं विक्रेत्यांमध्येही आनंद व उत्साहाचं वातावरण होतं.
रांगोळी, पणत्या, आकाश कंदील, लाह्या-बत्तासे, फुलं, आंब्याची पानं, पुजेसाठी लागणारं साहित्य अशी खरेदी आमदार मिटकरी व त्यांच्या पत्नीनं केली. यावेळी मिटकरी परिवारानं दुकानदारांशी संवाद साधला. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. नागरिकांनी कोणत्याही उत्सवाची खरेदी स्थानिक बाजारपेठेतच करावी. त्यामुळं स्थानिक विक्रेत्यांना त्याचा फायदा होईल, असं आवाहनही आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी केलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विदर्भातील अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक बाजारातच खरेदी केलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भंडारा-गोंदिया लोकसभेचे खासदार सुनिल मेंढे, क्रिकेटपटु गौतम गंभीर, अभिनेता जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार यांच्यासह अनेक नेते, अभिनेते, क्रीडापटूंनी मोदींच्या ‘व्होकल फॉर लोकल’ मोहिमेला सत्कारात्मक साद दिलीय. ट्विटवर (एक्स) सध्या हा विषय ट्रेंडिंगमध्ये आहे. भाजपचे कार्यकर्ते व सामान्य नागरीकही यात सक्रिय सहभाग घेत आहेत.
विदर्भातील भाजपचे नेते व कार्यकर्ते तर आवर्जुन स्थानिक छोट्या व्यावसायिकांकडुन खरेदी करीत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नागरीकांची गर्दी बाजारात वाढलीय. दर्जेदार वस्तू त्यांना माफक किमतीत मिळत असल्यानं खरेदीदारांकडुन मिळणारा प्रतिसादही वाढलाय, असं विक्रेत्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळं यंदाच्या दिवाळी बऱ्यापैकी व्यवसाय झाल्याचंही ग्रामीण भागातून शहरात आलेल्या या व्यावसायिकांचं म्हणणं आहे. परिणामी हे ग्रामीण व्यावसायिक आनंदी दिसत आहेत. यंदाची त्यांची दिवाळी खऱ्या अर्थानं समाधानी जात असल्याचं चित्र आहे.
Edited by : Prasannaa Jakate
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.