Nagpur झेडपी सदस्यांसाठी धोक्याची घंटा, अनेकांनी गमावल्या स्वतःच्या ग्रामपंचायती...

Grampanchayat : मोजक्याच सदस्यांसह पदाधिकाऱ्यांना त्यांचे गड राखता आले.
Nagpur
NagpurSarkarnama

Alarm bells for ZP members : नागपूर (Nagpur) जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची (Election) जबाबदारी राजकीय पक्षांनी जिल्हा परिषद सदस्यांच्या खांद्यावर दिली होती़. परंतु, मोजक्याच सदस्यांसह पदाधिकाऱ्यांना त्यांचे गड राखता आले. अनेकांना मात्र स्वगृह आणि सर्कलमध्ये पराभवाची चव चाखावी लागली़. काँग्रेसला (Congress) याचा मोठा फटका बसला तर भाजपचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़

जिल्हा परिषदेच्या (ZP) गटनेत्या अवंतिका लेकुरवाळे यांच्या कामठी तालुक्यातील मूळ गावी तरोडी बु. येथे भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते रमेश चिकटे यांच्या नेतृत्वात संपूर्ण भाजपचे पॅनल आले़. हा मोठा धक्का लेकुरवाळेंना मानण्यात येतो़. पारशिवनी तालुक्यातील टेकाडी ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांना राखता आली नाही़. तसेच जिल्हा परिषद सदस्य व विरोधी पक्ष उपनेते व्यंकट कारेमोरे यांना पारशिवनी तालुक्यातील त्यांची नीलज ग्रामपंचायत राखता आली नाही़. काटोल (Katol) तालुक्यात कमळाने मुसंडी पहायला मिळाली़. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांची मेंढेपठार ग्रामपंचायत हातची गेली़. शेकापचे येनवा सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य समीर उमप यांनी चार सरपंच निवडून आणले़.

नरखेड तालुक्यात कॉँग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख गटाचे प्रीतम कवरे यांच्या सर्कलमध्ये काँग्रेसला भोपळासुद्धा फोडता आला नाही़. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषदेचे विद्यमान कृषी सभापती बाळू जोध यांनी लोहारी सावंगा ग्रामपंचायत राखण्यात यश मिळविले. युवा नेते सलील देशमुख यांच्या वडविहिरात एकाहाती सत्ता आली़. कुही तालुक्यातील मांढळ ग्रामपंचायतींत भाजपची सत्ता आली़. येथे राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्य मनीषा फेंडर यांना केवळ एक सदस्य निवडून आणता आला़. जिल्ह्याचे लक्ष मौदा तालुक्यातील धानला ग्रामपंचायतींकडे होते. येथे जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य यांना जबर धक्का बसला़. भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांनी निर्विवाद यश संपादन केले.

लोकनेते म्हणून परिचित चाचेर सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे यांना एकही ग्रामपंचायत आपल्याकडे ठेवता आली नाही़. येथे काँग्रेस व प्रहारने मुसंडी मारली़. तारसा सर्कलच्या काँग्रेसच्या जि.प. सदस्य शालिनी देशमुख यांच्या गडाला भाजपने सुरुंग लावला़. रामटेक तालुक्यात मनसर सर्कलचे भाजप सदस्य कैलास डोंगरे यांना फटका बसला. येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेने करिश्मा दाखविला. नगरधन हा सर्कल काँग्रेसचे जि. प. सदस्य दुधराम सव्वालाखे यांचा गड समजला जातो. येथेही बाळासाहेबांच्या सेनेने त्यांना ‘राम’ दाखविला. हिंगणा तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे जि.प. सदस्य दिनेश उर्फ गुड्डू बंग यांच्या हातातून निसटली़. सावनेर तालुक्यातील पिपळा डाकबंगला येथून जि.प. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांचे पती विष्णू कोकड्डे हे सरपंचपदी आरुढ झाले़. कामठी तालुक्यात जि.प.च्या माजी सदस्य सविता रंगारी यांना सरपंचपदाची लॉटरी लागली.

सिर्सीत सभापती मिलिंद सुटेंची जादू..

उमरेड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे विद्यमान समाजकल्याण सभापती मिलिंद सुटे यांनी पक्षश्रेष्ठी सुनील केदार आणि मनोहर कुंभारे व आमदार राजू पारवे यांचा विश्वास सार्थ ठरवीत येथे काँग्रेसचा सरपंच बसविला. ही ग्रामपंचायत तालुक्यात सर्वांत मोठी म्हणून ओळखली जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com