प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, राज्य महिला आयोगाने घ्यावी दखल !

विद्यापीठाच्या (University) हिंदी विभागातील संशोधन केंद्रावर दोन विद्यार्थिनींनी (Studens) आपल्या विषयाचा आराखडा सादर केला असता, त्यांना विभागातील प्राध्यापकाने पैसे आणि शारीरिक सुखाची मागणी केली.
प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, राज्य महिला आयोगाने घ्यावी दखल !
Sarkarnama

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर (Nagpur) विद्यापीठाच्या हिंदी विभागात एका प्राध्यापकाने दोन विद्यार्थिनींचा लैंगिक आणि आर्थिक छळ केला, अशी तक्रार ७ मार्चला त्या विद्यार्थिनींनी एका सिनेट सदस्याकडे केली. त्या सदस्याने तक्रार कुलगुरूंपर्यंत पोहोचविली. पण ७ दिवस उलटूनही विद्यापीठाने काहीच कारवाई न केल्याने आता राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

विद्यापीठाच्या (University) हिंदी विभागातील (Hindi Department) संशोधन केंद्रावर दोन विद्यार्थिनींनी (Students) आपल्या विषयाचा आराखडा सादर केला असता, त्यांना विभागातील प्राध्यापकाने पैसे आणि शारीरिक सुखाची (sexual harassment) मागणी केली. तशी रीतसर तक्रार ७ मार्चला विद्यार्थिनींनी केली आहे. यांपैकी एका विद्यार्थिनीला पैशाची मागणी करण्यात आली. त्यावेळी तिने ते पैसे ऑनलाइन (Online) दिल्याची माहिती आहे. याबाबत व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे यांनी सिनेटमध्ये हा मुद्दा उपस्थित करीत, अशा प्रकारची तक्रार विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. अभय मुदगल यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी ती तक्रार कुलगुरूंकडे पाठविली होती.

ही तक्रार येताच ज्याच्यावर हे आरोप करण्यात आले. ते एका संघटनेच्या जवळचे असल्याने त्यांच्यावर कारवाई कशी करायची, याबाबत बराच खल करण्यात आला. यासाठी त्यांच्या उपस्थितीत शनिवारी विद्यापीठात बैठकही घेण्यात आली. मात्र, कारवाईबाबत कुठलेच निर्देश कुलगुरूंकडून देण्यात आले नाही. त्यामुळे हे प्रकरण दाबण्यासाठीच विद्यापीठ प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा अशा तक्रारीवरून महिला आयोग स्वतः दखल घेऊन कारवाईचे निर्देश देते. त्यामुळे आता या तक्रारीवर त्यांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.

प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, राज्य महिला आयोगाने घ्यावी दखल !
विद्यापीठ कायद्याच्या विरोधात उदय सामंत यांना एक लाख फोन काॅल: भारतीय जनता युवा मोर्चा

आयोगाच्यावतीने कुणालाही सोडले जाणार नाही. आयोग दोषींवर योग्य ती कारवाई नियमानुसार करेल. याबाबत नेमकी तक्रार काय आहे, ही माहिती घेण्यात येईल.

- आभा पांडे, राज्य महिला (Women's Commission) आयोग सदस्य.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com