

Amravati sexual abuse case : अमरावतीच्या अचलपूर भागातील परतवाडा इथल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात राजकारण तापू लागले आहे. युनायटेड रिपब्लिकन फोरमचे अध्यक्ष अलीम पटेल यांनी भाजप खासदार अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण तायडे आणि शिवराय कुलकर्णी यांच्यावर निशाणा साधला आहे.
या प्रकरणात या सर्वांनी हिंदू मुलीच बळी पडल्याचा दावा केला होता. यांचा हेतून समाजात अराजकता माजवण्याचा होता. त्यांनी समोर येऊन जनतेची माफी मागावी, असे अलीम पटेल यांनी म्हटलं आहे. अलीम पटेल यांच्या या मागणीवरून अमरावतीमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार असल्याचे दिसते आहे.
अमरावतीमधील (Amravati) परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणात सुरूवातीला भाजप खासदार अनिल बोंडे चांगलेच आक्रमक झाले होते. पोलिस अधीक्षक विशाल आनंद आणि शिवराय कुलकर्णी यांची भेट घेतली होती. खासदार बोंडे स्वतः तक्रारदार झाले होते. त्यांनी या प्रकरणात180 हिंदू मुली बळी पडल्या असून त्यांचे 350 व्हिडिओ असल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती.
खासदार बोंडे यांच्यानंतर माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana), आमदार प्रवीण तायडे यांनी आक्रमकपणे मुद्दा उचलून धरला आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या प्रकरणाची माहिती घेत पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणातील हिंदू-मुस्लिम वादाची हवाच काढून घेतली. प्रकरणात बळी पडलेल्या पीडिता, या अल्पसंख्याक असून, त्या आठ ते नऊ असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत होत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याला 27 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अयान अहमद याच्या घराचे अतिक्रमण अचलपूर नगरपालिकेने पाडले आहे. तसेच अयान अहमद याची पोलिसांनी परतवाडा इथून धिंड देखील काढली आहे.
दरम्यान, या प्रकरणात भाजपने सुरूवातीला देऊन केलेल्या जातीय रंगावर युनायटेड रिपब्लिकन फोरमचे अध्यक्ष अलीम पटेल यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, "पोलिस अधीक्षक विशाल आनंद आणि अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या प्राथमिक तपासात आतापर्यंत आठ ते नऊ मुली पीडिता आहेत. या सर्व पीडिता अल्पसंख्याक समाजातील आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण तायडे, पर्वत कुलकर्णी, माजी खासदार नवनीत राणा यांनी दावा केला आहे की, या प्रकरणात 180 पीडिता आहे. या सर्व पीडिता हिंदू समाजातील आहे. यात 350 व्हिडिओ आहेत."
या पीडिता मुली कोणत्याही समाजाच्या असोत, त्यांना चारित्र्य अन् इज्जत आहे. त्यांना न्याय मिळून द्यायचा आहे. तुमच्या जवळ 180 पीडितांचे नाव आहेत, 350 व्हिडिओ आहेत, ते पुरावे होऊ शकतात. तर त्यांना आव्हान आहे की, हे सर्व पुरावे समोर घेऊन या. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील पुरावे सादर करण्याचे आवाहन केलं आहे, याची आठवण अलीम पटेल यांनी करून दिली.
या पुराव्यांमुळे पोलिसांना मदतच होईल. या प्रकरणातील आरोपी आणि सहआरोपी आहेत, त्या सर्वांना कायदेशीर दृष्ट्या मोठ्यातली-मोठी शिक्षा देण्यास मदत होईल. पण ज्यांनी फक्त दावेच केले आहेत, ते फक्त समाजमध्ये फूट, अराजकता माजवण्याचा प्रकार केल्याचा दिसतो. त्यांचा राजकीय हेतूसाठी वापर केलेला दिसतो. हे प्रकरण स्वार्थासाठी वापरले गेले आहे. या मुद्याचा दुरुपयोग केला आहे. त्यामुळे या सर्वांनी समोर येऊन जनतेची माफी मागितली पाहिजे, असे अलीम पटेल यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.