Paratwada Scandal : परतवाडा लैंगिक केसमध्ये नवा ट्विस्ट! प्यारे खान यांनी माहिती समोर आणताच, हिंदू-मुस्लिम रंग फिका

Minority Commission Chairman Pyare Khan makes a significant disclosure in the Paratwada sexual exploitation case in Amravati : अमरावतीच्या परतवाडा इथल्या लैंगिक शोषणावर अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अफवा पसरवणाऱ्यांविरोधात 'पाॅस्को'अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत.
Paratwada Scandal
Paratwada ScandalSarkarnama
Published on
Updated on

Amravati Paratwada case : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा लैंगिक शोषणाला काही जण हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न करत असून, त्यातून वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. यावर अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी खरी माहिती देत, या प्रकरणामागील हिंदू-मुस्लिम वादाची हवाच काढून घेतली.

'या प्रकरणात समोर आलेल्या आठ पीडितांचे व्हिडिओ अन् फोटो हे मुस्लिम युवतींचे आहेत. जे कोणी या प्रकरणावरून हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करणाऱ्या अफवा पसरवले, त्याच्याविरोधात 'पाॅस्को'अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत,' असे प्यारे खान यांनी म्हटलं आहे.

प्यारे खान म्हणाले, "परतवाडा लैंगिक अत्याचारांमध्ये सर्वच्या सर्व मुली, या हिंदू आहेत, असे सांगितले जात आहे. परंतु तसे काहीच नाही. शोषणाला बळी पडलेल्या सर्व मुली, या मुस्लिम (Muslim) समाजाच्या आहेत. तिथे अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. या आपण मागे तिथे दंगल घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे."

या सर्व प्रकारावर विशेष पोलिस (Police) महानिरीक्षक राकेश ओला आणि पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांना, अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी सूचना केली आहे. शोषणाला बळी पडलेल्या मुलींमध्ये परतवाड्यामधील चार, अमरावतीमधील तीन आणि एक नागपूरमधील आहे, अशी माहिती समोर येत आहे. अल्पसंख्याक आयोग या प्रकरणावर सर्व लक्ष ठेवून आहे, असेही प्यारे खान यांनी म्हटलं.

Paratwada Scandal
Paratwada boycott accused : परतवाडा लैगिंक शोषण प्रकरण पेटलं! अयान अहमदसह कुटुंबावर बहिष्कार, मुस्लिम समाज आक्रमक

अल्पसंख्याक आयोगाच्या पथकाला तपास, असं आढळला आहे की, नयन सुगंधे हा व्यक्ती अयान अहमद याला यासर्व लैंगिक शोषणासाठी फ्लॅट उपलब्ध करून देत होता. तिथेच हे सर्व कांड होत होते, असे प्यारे खान यांनी म्हटलं आहे. शोषणाला बळी पडलेल्या आठ मुलींपैकी, दोन मुलींचे शोषणाचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि इतर सहा मुलींचे फोटो आहेत, असे प्यारे खान यांनी सांगितलं.

Paratwada Scandal
Paratwada Viral Video: अमरावती लैगिंक शोषण घटनेचे पडसाद; बाजारपेठ बंद, 'AIMIM'चा खुलासा, तर आरोपीच्या घराला 'बुलडोझर' लावण्याची तयारी?

नवनीत राणांच्या भूमिकेवर टीका

भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी या लैंगिक शोषणामध्ये सर्वाधिक बळी पडलेल्या, या हिंदू मुली आहेत, असे विधान केले आहे. यावर प्यारे खान म्हणाले, "नवनीत राणा या महाराष्ट्र आणि देशाला बरबाद करत आहेत, तसेच हिंदूंना खतरेमध्ये आणत आहेत. हिंदू युवकांना बरबाद करत आहेत. मी नागपूरमध्ये बसलोय आणि त्या अमरावतीमध्ये आहेत. मला कळत आहे की, या शोषणामध्ये एकही हिंदू मुलगी नाही. मग या कसं काय म्हणू शकतात की 180 मुली या सर्वच्या सर्व हिंदू होत्या आणि एकही बुरखेवाले नव्हती. स्वतः एक महिला असून त्यांनी, असे विधान करणे चुकीचे आहे."

पीडितांची ओळख खुली केल्यास खबरदार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांसाठी देशात विधेयक आणत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, आणि या अशा सांसद आहेत की, त्या महिलांना बरबाद करत आहेत. शोषणाला बळी पडलेल्या मुलींविषयी कोणी चुकीचं आणि त्यांच्या ओळख पटेल, असं कोणी विधान करत असेल, तर ती कितीही मोठी व्यक्ती, असो तर त्याच्याविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याची माहिती, प्यारे खान यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com