Ambadas Danve News : अजून किती आत्महत्या होण्याची वाट बघताय, अंबादास दानवे आक्रमक !

Yavatmal : शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळाला नाही.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Legislative Council News : यवतमाळ जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्ज योजना व प्रोत्साहन भत्ता प्रलंबित प्रकरणी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली. अजून किती आत्महत्या होण्याची वाट बघताय, असा संतप्त सवाल करत त्यांनी सरकारला फैलावर घेतले.

यवतमाळ जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्ज योजनेत बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळाला नाही. २०१७ पासून या जिल्ह्यात २३ स्क्रीन याद्या प्रसिद्ध झाल्या. अजूनही १ लाख २८ हजार ४६४ अर्ज पात्र शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होणारा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्यातील १ लाख २८ हजार ४६४ शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे, असे दानवेंनी सभागृहात सांगितले.

मागील वर्षभरात ३०० आणि गेल्या तीन महिन्यात ९० शेतकऱ्यांनी या जिल्ह्यात आत्महत्या केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व प्रोत्साहन भत्ता अनुदान शेतकऱ्यांना कधी देणार? अजून किती शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची सरकार वाट बघणार? तसेच ज्यांची कर्जमाफी झाली नाही, त्यांना केव्हापर्यंत कर्जमाफी देणार, असा सवाल दानवे यांनी सरकारला विचारला.

संपूर्ण राज्याचा आढावा घेऊन पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ सरकार देणार का, असाही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. गेल्या दीड वर्षांपासून पोर्टल बंद होते, ते सुरू करण्याचे काम सुरू आहे. लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करू, असे सरकारकडून सांगण्यात आले.

Ambadas Danve
Ambadas Danve News: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये नवीन ते काय, असं म्हणणाऱ्या सत्तारांनी राजीनामा द्यावा !

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना तीन भागांत विभागलेली आहे. आतापर्यंत १ लाख ८६ हजार ७८१ शेतकऱ्यांना १ हजार ३८ कोटी वाटप केले. दुसरा भाग वन टाइम सेटलमेंटचा आहे. यात दीड लाख भरणाऱ्या ९ हजार ९३५ शेतकऱ्यांना १०७ कोटी रुपये दिले. नियमित कर्ज फेडणाऱ्या २५००० अनुदानाचा विषय होता. ११८.६५ कोटी रुपये देण्यात आल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. एप्रिलमध्ये पोर्टल सुरू करण्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.

बजेटमध्ये वित्तमंत्र्यांनी ८०० कोटी रुपये दिले आहेत. ३१ मार्चपर्यंत बॅंकांना मिसमॅच झालेली प्रकरणे टॅली करायला सांगितले आहे. ३१ मार्चपर्यंत ९८ टक्के शेतकऱ्यांना पैसे मिळतील. असे सांगितल्यावर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात बैठक घेण्याचे निर्देश सरकारला दिले.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने (State Government) घेतला. पण त्यामध्ये अटी इतक्या घातल्या की त्यांना लाभच मिळाला नाही. नियमित कर्ज भरणाऱ्यांना अटीशिवाय देणार का, असा सवाल एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला. समृद्धी महामार्गात १६०० कोटी माफ करता येतात. ८० कोटी जीएसटीसुद्धा माफ करता येतो. पण शेतकऱ्यांना (Farmers) द्यायला सरकारकडे पैसे नाहीत असा घणाघाती आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com