Ambadas Danve News: पावसाला जोर, नाचण्याला मोर आला; फास घेण्या माणसाला शासनाचा दोर आला..!

Government : नवीन स्प्रिंकलर सरकारने दिले नाही.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama

Ambadas Danve Criticized the Budget: उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. आज विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी अर्थसंकल्पावर सडकून टिका केली. पंचामृतामध्ये अनेक घोषणा केल्या गेल्या, पण त्या पूर्ण होणार नाहीत, दावा दानवे यांनी केला.

अर्थसंकल्पाबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले, अतिवृष्टीत शेतांमधील स्प्रिंकलर वाहून गेले. जे वाचले त्यामध्ये गाळ फसला. त्यामुळे ते आता कामाचे राहिलेले नाही. विहिरीत उतरण्यासाठी आम्ही आता त्याचा वापर करतो. पण नवीन स्प्रिंकलर सरकारने दिले नाही. यावेळी बाजरी २५ टक्के, नाजणी ११ टक्के आणि जिऱ्याचे उत्पादन ८६ टक्केच झाले. उत्पादन कमी होणे चांगले लक्षण नाही. मुळात हे उत्पादन कमी झाले नाही, तर आपत्तीमुळे झालेले हे नुकसान आहे. कृषी विभागाने लक्ष देण्याची आणि मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

वन डिस्ट्रीक वन प्रॉडक्ट योजना फक्त कागदावर आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही स्थिती धोकादायक आहे. शेतकर्यांना आताही संकटांना सामोरे जावे लागते आहे. अन्नधान्यासारखी तेलबियांची उत्पादकता घटलेली आहे. कापूस, आंबा, द्राक्ष, केळी, संत्रा या फळांचेही उत्पादन घटले आहे. सरकार पंचामृत सांगत असताना प्रोजेक्ट जाहिर केले. नागपूरमध्ये संत्रा मराठवाड्यातील पैठण येथे मोसंबी आणि कोकणात काजूवर प्रक्रिया उद्योग स्थापण्याबाबत यापूर्वीही घोषणा झाली होती. पण तीसुद्धा कादगावरच असल्याचे दानवेंनी सभागृहाला सांगितले.

मराठवाड्यात (Marathwada) कापसावर प्रक्रिया प्रकल्प झाला पाहिजे. हळदीच्या प्रकल्पाचा उल्लेख केलेला नाही. कापसाच्या आयातीला सरकार परवानगी देते. पण आपल्या शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या कापसासाठी सरकार काहीही करत नाही. आज कापसाचा दर पाहिला तर दररोज रोज १०० रुपयांनी उतरतो आहे. आपल्या शेतकऱ्याचा कापूस असताना आपण आयात का करतो? हे सरकारचे धोरण असेल तर शेतकरी कसा समोर जाणार? आपण ऑस्ट्रेलियाचा कापूस मागवतो, हे चुकीचे आहे, असे म्हणत त्यांनी सरकारच्या धोरणांवर टिका केली.

Ambadas Danve
Ambadas Danve News: वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार, दानवेंनी उठवला होता आवाज !

मोसंबीवर प्रक्रिया उद्योगाची घोषणा केली नाही. शेतकऱ्यांना (Farmers) विम्याचे हप्ते मिळाले नही. सरकार (State Government) आणि कृषी विभाग अन्याय करत आहे. पिक विम्यावर सातत्याने बोलत आहो, पण काहीही उपयोग झाला नाही. २ रूपये, ४०० रुपये, ६०० रुपये असा विमा शेतकऱ्यांना दिला, हा काय प्रकार आहे, याचेही उत्तर सरकारने दिले नाही. आता सरकारने १ रुपयात विमा घोषित केला. पण तो मिळणार का, हा खरा प्रश्‍न आहे. विम्याचे पैसे येऊन दीड ते दोन महिने झाले तरीही कंपन्या ते शेतकऱ्यांना देत नाही, असे सांगत अंबादास दानवे यांनी खालील कवितेतून सरकारवर घणाघाती टिका केली.

पावसाला जोर, अन् नाचण्याला मोर आला

फास घेण्या माणसाला शासनाचा दोर आला

सातबारा चोरण्याला सावकारी चोर आला

पाहुनिया हे सारे जीवनाला घोर आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com