Ambazari Amusement Park : काँग्रेसचे आमदार ठाकरेंचं 'देवेंद्रास्त्र' निशाण्यावर लागलं; अंबाझरी अम्युजमेंट पार्क रद्द होणार !

Nagpur : परवानगी न घेताच पाडण्यात आलं होतं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह.
Vikas Thakre and Devendra Fadanvis
Vikas Thakre and Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur City Political News : काँग्रेसचे महासचिव नरेंद्र जिचकार यांच्या विरोधात काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चालवलेले 'देवेंद्रास्त्र' ठीक निशाण्यावर लागलं आहे. अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह कोणाचीही परवानगी न घेता पाडण्यात आलं. त्यावेळी राज्यात वेगळं सरकार अस्तित्वात होतं. मात्र, आता सरकार महाधिवक्त्यांच्या मदतीने अंबाझरी अम्युजमेंट पार्कचा प्रकल्पच रद्द करणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. १८) नागपुरात केली. (Dr. Babasaheb Ambedkar Cultural Hall was demolished without permission)

काँग्रेसचे महासचिव नरेंद्र जिचकार यांच्या कंपनीला डॉ. आंबेडकर सभागृहाच्या जागेवर अम्युजमेंट पार्क उभारण्याचं काम मिळणार होतं. अंबाझरी प्रकल्पातील सभागृह पाडून तेथे अम्युजमेंट पार्क उभारण्यासाठी नागपुरातीलच एक मोठा नेता सक्रिय आहे, अशी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. मात्र, आता हे प्रकरण काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नेल्याने सभागृह पाडून त्या जागी कोट्यवधीचा प्रकल्प उभारण्याचे काम थांबणार आहे.

आपण नागपूरचे महापौर असताना अनेक कार्यक्रम येथे घेतले होते. १९७२ मध्ये येथे जागतिक बौद्ध परिषद झाली. कोणाचीही परवानगी न घेता हे स्मारक पाडण्यात आलं. तेव्हा राज्यात सरकार वेगळं होतं. तरी आमदार विकास ठाकरे यांनी सरकारविरोधी आंदोलन केलं होतं. आपल्याकडे या संदर्भात बैठक झाल्यानंतर सभागृह आणि स्मारकाच्या मुद्द्यावर स्थगिती देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही येथील बांधकाम पाडण्यात आलं, असं फडणवीस म्हणाले.

सध्या अंबाझरीच्या मुद्द्यावरून नागपुरात आंदोलन सुरू आहे. येथे शासनाने आपल्या निधीतून स्मारक आणि बांधकाम केलं होतं. त्यामुळे कोणत्याही खासगी व्यक्तीला ही जमीन ताब्यात देण्यात येणार नाही. राज्याचे महाधिवक्ता यांचा सल्ला घेऊन हा प्रकल्प रद्द केला जाईल, असा शब्द देत फडणवीस यांनी २७२ दिवसांपासून सुरू असलेला आंदोलन मागे घ्यावं, असा आवाहन केलं.

जमिनीतून सगळेच रहस्य निघणार?

अंबाझरी येथील स्मारक जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर येथे अम्युजमेंट पार्क उभारण्याचं काम काँग्रेसचे महासचिव नरेंद्र जिचकार यांना देण्यात येणार होतं. बाबासाहेबांची दीक्षाभूमी असलेल्या नागपुरात त्यांचं स्मारक काढल्या जातं आणि त्यांच्याच अनुयायी नेत्यांना याबाबत कानोकान खबर होत नाही, याबाबत देवगिरी वरील चर्चेदरम्यान कमालीचं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.

हे बांधकाम कसं पाडण्यात आलं, कुणाकुणाची याला संमती होती, यामागे कोणकोणते नेते आहेत, हे रहस्य सध्या अंबाझरी प्रकल्पाच्या जमिनीत दडलेली आहेत. आता काँग्रेसचे नेते आमदार विकास ठाकरे यांनी तक्रार केली म्हटल्यावर या प्रकरणातील सत्य जमिनीतून उकरून बाहेर काढण्याची संधी राज्यातील व नागपुरातील भाजपला मिळाली आहे. अंबाझरीच्या या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी पडद्यामागच्या खऱ्या सूत्रधार आरोपींचा चेहरा आंबेडकरी जनतेसमोर आणावा, अशी भावना व्यक्त होत आहे.

Edited By : Atul Mehere

Vikas Thakre and Devendra Fadanvis
Fadanvis's Devgiri News : फडणवीसांच्या देवगिरीवर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, आयुक्तांचा खुलासा !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com