Amol Mitkari Attacks Case : मिटकरी गाडी हल्ला प्रकरण; मुख्य सूत्रधार दुनबळे अद्याप फरार, अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव

Karnabala Dunbale, Amol Mitkari Attacks Case : अमोल मिटकरी गाडी हल्ला प्रकरणात काल अटक करण्यात आलेल्या 6 मनसे कार्यकर्त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
Karnabala Dunbale, Amol Mitkari Attacks Case
Karnabala Dunbale, Amol Mitkari Attacks CaseSarkarnama
Published on
Updated on

Akola News, 02 August : अकोला येथील शासकीय विश्रामगृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या गाडीवर हल्ला केल्या प्रकरणी मनसेचे 5 कार्यकर्ते अटकेत आहेत. तर जवळपास 20 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटकेत असलेल्या सचिन गालट, ललित यावलकर, अरविंद शुक्ला मुकेश धोंडफळे आणि रुपेश तायडे या 5 जणांच्या जामिनावर आज (ता. 2 ऑगस्ट) शुक्रवारी दुपारी सुनावणी होणार आहे.

तर मनसेचे (MNS) सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अकोला जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 7 ऑगस्टला होणार सुनावणी होणार आहे. अमोल मिटकरी गाडी हल्ला प्रकरणात काल अटक करण्यात आलेल्या 6 मनसे कार्यकर्त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. आतापर्यंत जवळपास 20 कार्यकर्त्यांवर तोडफोड प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत.

Karnabala Dunbale, Amol Mitkari Attacks Case
MVA News : ठाकरेंना 100 तर शरद पवारांना 80 जागा; महाविकास आघाडीचा फाॅम्युला ठरला?

यातील प्रमुख आरोपी पंकज साबळेसह तीन आरोपींना जामीन मिळाला आहे. मात्र, गाडी तोडफोड प्रकरणातील मुख्य सूत्रधार कर्णबाळा दुनबळे हे अद्याप फरार आहेत. दुनबळे यांच्या अटकेसाठी अकोला पोलिसांचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. मात्र, सध्या कर्णबाळा हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे.

Karnabala Dunbale, Amol Mitkari Attacks Case
Jitendra Awhad : आव्हाडांच्या गाडीवर हल्ला हे त्यांच्या कर्माचे फळ, अक्षय महाराज भोसलेंची टीका

20 पेक्षा अधिक मनसैनिकांवर गुन्हा

दरम्यान, गाडी तोडफोड प्रकरणी आता मनसेचे पदाधिकारी सचिन गव्हाळे आणि मनसेचे माजी नगरसेवक राजेश काळे यांनाही अटक करण्यात आली आहे. अकोल्यातील सरकारी बगीचा जवळून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत 7 जण अटकेट आहेत तर तिघांना जामीन मिळाला आहे. मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com