MVA News : ठाकरेंना 100 तर शरद पवारांना 80 जागा; महाविकास आघाडीचा फाॅम्युला ठरला?

Assembly Election 2024 sharad Pawar uddhav Thackeray : जागा वाटप करताना महाविकास आघाडीकडून 2019 मधील विधानसभा निवडणुकीचा निकाल तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा आधार घेतला जाणार आहे.
Sharad Pawar, Uddhav Tackery, Nana Patole
Sharad Pawar, Uddhav Tackery, Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

MVA News : महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस किती जागा लढणार याची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात बुधवारी (ता.7) बैठक होणार आहे.

ठाकरे गट 100, काँग्रेस 100 आणि शरद पवार गटाने 80 जागांवर निवडणूक लढवावी, या संदर्भात महाविकास आघाडीतील वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झाली आहे, असे वृत्त 'सकाळ'ने प्रसिद्ध केले आहे.

लोकसभेत महाविकास आघाडीला तब्बल 30 जागा मिळाल्या. अपक्ष विशाल पाटील हे देखील काँग्रेससोबत आले आहेत. मात्र, विधानसभेसाठी महायुतीने सावध पाऊले टाकतं अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. 'लाडकी बहीण' योजनेतून महिला मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत MVA जागा वाटप निश्चित करून प्रचाराला सुरुवात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Sharad Pawar, Uddhav Tackery, Nana Patole
Kolhapur Toll : कोल्हापूरचा टोल हे सतेज पाटलांचेच पाप; टोलप्रश्नी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या काँग्रेसला भाजप नेत्याचा टोला

2019 निवडणुकीचा आधार घेणार

जागा वाटप करताना महाविकास आघाडीकडून 2019 मधील विधानसभा निवडणुकीचा निकाल तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा आधार घेतला जाणार आहे. पक्षांनी आणि त्रयस्थ संस्थांनी केलेले सर्वे केले होते. त्याची आधारही जागा वाटपासाठी घेतला जाणार असल्याचे समजते.

मुख्यमंत्री कोणाचा?

महाविकास आघाडीत छोटा भाऊ, मोठा भाऊ असे कुठलेही सुत्र नाही. जागा वाटप झाल्यानंतर निवडणुकीत ज्याच्या सर्वाधिक जागा विजयी होतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे सुत्र महाविकास विकास आघाडीच्या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस फुंकणार प्रचाराचे रणशिंग

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती 20 ऑगस्टला आहे. ती काँग्रेसकडून Congress साजरी केली जाणार आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी मुंबईत येणार आहे. त्यावेळी जाहीर सभा घेत निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग काँग्रेस फुंकणार आहे.

Sharad Pawar, Uddhav Tackery, Nana Patole
Shyamkumar Barve : श्यामकुमार बर्वेंनी संसदेत सरकारला घेरले! अर्थसंकल्पातील मोठ्या त्रुटीकडे वेधले लक्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com