Amol Mitkari News : त्यांना चर्चाच करायची होती, तर कुठेही भेटू शकले असते; रस्ता बदलण्याचा प्रश्‍नच नाही !

Akola : माझ्या नियोजित मार्गात अंबाशी हे गाव लागलेच नाही.
Amol Mitkari
Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

Akola District Political News : मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून आमदार अमोल मिटकरींनी रस्ता बदलला, अशी माहिती काही लोकांकडून पेरली गेली होती. पण मी माझ्या नियोजित रस्त्याने सांगोळ्याहून अकोल्याला गेलो. कुणाला माझ्याशी चर्चाच करायची होती, तर ते या मार्गात कुठेही मला भेटू शकले असते, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी म्हणाले. (The village of Ambashi was not included in my planned route)

आमदार मिटकरींनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल काही वक्तव्य केले होते आणि त्यामुळे संतापलेले मराठा समाजाचे कार्यकर्ते त्यांना जाब विचारणार होते. त्यामुळे आमदार मिटकरींनी आपला रस्ता बदलला, अशी माहिती काही लोकांनी पसरवली होती. यासंदर्भात ‘सरकारनामा’शी बोलताना आमदार मिटकरी म्हणाले, मी लपवाछपवी करणारा माणूस नाही, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माझ्या नियोजित कार्यक्रमानुसार मी पातूर तालुक्यातील सांगोळा येथे रावण मूर्तीचे पूजन केले. तेथे आमदार विकास निधीतून १५ लाख रुपये मंजूर केले आहेत. त्या कामाचे भूमिपूजन केले. तेथून आलेगावला गेलो तेथे काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या, जेवण केले. त्यानंतर आसोला येथे एका ठिकाणी सांत्वनपर भेट दिली. त्यानंतर तेथून अकोल्याला गेलो. माझ्या नियोजित मार्गात अंबाशी हे गाव लागलेच नाही.

काही लोकांना माझ्याशी चर्चाच करायची होती, तर मला सांगोळा ते अकोला या दरम्यान कुठेही भेटू शकले असते, पण तसे न करता ते अंबाशी येथे थांबले, कशाला? ते त्यांनाच ठाऊक. पण त्या मार्गाने आमचे राष्‍ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राम हिंगणकर गेले. त्यांच्या गाडीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चिन्ह दिसल्याने काही लोकांनी त्यांना अंबाशीला थांबवले. ‘आमदार कुठे आहेत’, असे हिंगणकर यांना विचारले. पण त्यांनी या किंवा इतर विषयावर हिंगणकर यांच्याशी कुठलीही चर्चा केली नाही, असे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले.

यापूर्वी आमदार अमोल मिटकरी यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण ट्विट करून दिले होते. त्यांनी आपला व्हिडिओ पोस्ट करीत दिलगिरी व्यक्त केली होती. चुकीच्या वार्तांकनाद्वारे एक मेसेज माझ्याबद्दल जाणीवपूर्वक फिरवला गेला. जरांगे पाटील यांच्याबद्दल अमोल मिटकरींनी अपशब्द बोलल्याचे वृत्त पसरवले गेले. गेल्या वीस वर्षांपासून मी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता राहिलो आहे.

मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मी शिव शाहू यात्रेमध्ये अनेकदा मी छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबतही होतो. उलट जरांगे पाटील यांच्या सभेबद्दल जी आगपाखड गुणरत्न सदावर्ते यांनी केली. सदावर्ते यांचा स्क्रिप्ट रायटर कोण अशा अनुषंगाने माझं ते वक्तव्य होतं. यात जरांगे पाटील यांचा अपमान होईल, असं वक्तव्य नव्हतं. माझा मराठा आरक्षणाला शंभर टक्के पाठिंबा आहे, असेही आमदार मिटकरी यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Amol Mitkari
Amol Mitkari News : रावण दहनाला अमोल मिटकरींचा कडाडून विरोध, केली 'ही' मागणी !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com