Amol Mitkari-Shiva Mohod
Amol Mitkari-Shiva MohodSarkarnama

राष्ट्रवादीतील वाद पेटला; अमोल मिटकरींच्या नोटिशीला मोहोडांचे ‘झुकेगा नहीं साला’ने उत्तर

आमदार अमोल मिटकरींवर झालेले आरोप, त्यावर त्यांनी केलेला पलटवार आणि शिवा मोहोड यांनी मिटकरींवर पुन्हा केलेले आरोप? पक्षातील प्रस्थापितांवर केलेले आरोप पुढच्या काळात कोणतं रूप धारण करतात, हे पाहण आता औत्सुक्याचं ठरणार आहे.
Published on

अकोला : अकोल्यात (Akola) आमदार अमोल मिटकरी (amol Mitkari) आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वाद पुन्हा नव्या वळणावर गेला आहे. आता आमदार मिटकरी यांच्याकडून शिवा मोहोड यांना आपली समाजात प्रतिमा मलीन केल्यामुळे पाच कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस वकिलामार्फत बजावण्यात आली आहे. मोहोड यांच्यासह अन्य दोघांनाही नोटीस बजावल्या गेल्या आहेत. दरम्यान, शिवा मोहोड यांनी ‘झुकेगा नहीं साला’ असे म्हणत मटकरी यांना इशारा दिला आहे. (Amol Mitkari's defamation notice to NCP Akola District President Shiva Mohod)

दरम्यान, आमदार अमोल मिटकरींवर झालेले आरोप, त्यावर त्यांनी केलेला पलटवार आणि शिवा मोहोड यांनी मिटकरींवर पुन्हा केलेले आरोप? पक्षातील प्रस्थापितांवर केलेले आरोप पुढच्या काळात कोणतं रूप धारण करतात, हे पाहण आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

Amol Mitkari-Shiva Mohod
गणेशोत्सवात मुंबईत असणं, हा एक विशेष अनुभव... : अमित शहांनी व्यक्त केल्या मराठीतून भावना

अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या नेत्यांमध्ये एकमेकांवर गंभीर आरोप करण्याची मालिका सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच कमिशनखोरीचा आरोप केला होता. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे पक्षाच्या आढावा बैठकीत हा प्रकार घडला होता. त्या आरोपांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Amol Mitkari-Shiva Mohod
मंत्र्यांना निवडणुकीची चाहूल; दिवाळीपूर्वी रंगणार या महापालिकांमध्ये रणधुमाळी!

आमदार अमोल मिटकरी यांनी मोहोड यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. आरोप करणाऱ्या शिवा मोहोड यांचं चरित्र आणि चारित्र्य तपासावं, असा पलटवार आमदार मिटकरींनी केला होता. त्यावर प्रतिउत्तर देत शिवा मोहोड यांनी मिटकरी हे ‘घासलेट चोर’ आहेत, त्यांच्या घरी ‘घासलेट’चं लायसन होतं, त्यातून ते घासलेटचे चोरी करत असल्याचे आरोप शिवा मोहोड यांनी केला आहे. इतरही अनेक आरोप मोहोड यांनी आमदार मिटकरी यांच्यावर केले आहेत.

Amol Mitkari-Shiva Mohod
...अन्‌ सुधीर मुनगंटीवार मध्यरात्री बारा वाजता पोचले रुग्णालयात!

एकमेकांवर आरोप करण्याचे हे प्रकरण वाढतच गेले आहे. आता या आरोपांविरोधात आमदार अमोल मिटकरी यांनी शिवा मोहोड यांना मानहानी झाल्याचा आरोप करीत नोटीस बजावली आहे. दरम्यान, शिवा मोहोड यांनी ‘झुकेगा नहीं साला’ असे म्हणत मटकरी यांना इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com