Amravati APMC Election : ठाकुरांच्या माजी संचालकांचा राणांच्या छावणीत आश्रय, अमरावतीत कडवी झुंज !

Yashomati Thakur : राजकीय पक्षांच्या थेट हस्तक्षेपाने समीकरणे बदलली आहेत.
Ravi Rana and Yashomati Thakur
Ravi Rana and Yashomati ThakurSarkarnama
Published on
Updated on

The equations have changed : अमरावती बाजार समितीच्या निवडणुकीत परंपरागत प्रतिस्पर्धी माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर व आमदार रवी राणा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एका गटाने तिसरे पॅनेल आणल्याने मतविभागणीची दाट शक्यता आहे. (The reputation of Yashomati Thakur and MLA Ravi Rana is at stake)

सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील अकरा जागांपैकी सात जागांवर थेट तर चार जागांवर तिहेरी लढत होत आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या थेट हस्तक्षेपाने समीकरणे बदलली आहेत. काँग्रेसच्या आमदार, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलला अपक्ष आमदार रवी राणा यांनी आव्हान दिले आहे. अ‍ॅड. ठाकूर यांचे पॅनेल महाविकास आघाडी पुरस्कृत आहे,

आमदार रवी राणा यांच्या शेतकरी पॅनलला भाजपसोबतच यावेळी सहकार नेते व माजी सभापती विलास महल्ले यांचीही साथ आहे. गतवेळी यशोमती ठाकूर यांच्यासोबतच्या काही माजी संचालकांनी राणा यांच्या छावणीत आश्रय घेतला आहे. महाविकास आघाडीत स्थान न दिल्याने दुखावलेल्या शिवसेनेच्या एका गटाने स्वतंत्र बळीराजा पॅनेल जन्मास घालून दहा उमेदवार रिंगणात आणले आहेत.

राजकीय क्षेत्रात आमदार यशोमती ठाकूर व आमदार रवी राणा हे परंपरागत विरोधक आहेत. सहकार क्षेत्रातही त्यांनी ही प्रतिमा आता स्थापन केली आहे. आमदार राणा यांचे बंधू या निवडणुकीत सभापतिपदाचा चेहरा बनले आहेत. त्यामुळे बहुमत मिळवण्यासाठी आमदार राणा यांचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत.

Ravi Rana and Yashomati Thakur
Video : Yashomati Thakur जनतेच्या मनातले बोलल्यात...

गतवेळी यशोमती ठाकूर यांचे बाजार समितीवर वर्चस्व होते. ते कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. अ‍ॅड. ठाकूर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी आमदार स्व. संजय बंड गट आहे. तर, आमदार राणा यांना भाजपमधून रसद मिळत आहे.

ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) अमरावतीच्या (Amravati) पालकमंत्री असताना आमदार राणा आणि ठाकूर संघर्ष जनतेने बघितला. आता प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अमरावती बाजार समितीमध्येही (APMC Election) या दोन नेत्यांमध्ये कडवी झुंड बघायला मिळणार आहे. सहकार क्षेत्राचा ठाकूर गटाला मोठा अनुभव आहे, तर रवी राणा (Ravi Rana) यांनी भाजपच्या साथीने दंड थोपटले आहेत. निकाल काहीही लागो, मुकाबला मात्र तगडा होणार, हे निश्‍चित.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com