Bachchu Kadu : लाडक्या बहि‍णींची फसवणूक, हा 'क्राईमच'; बच्चू कडू म्हणाले, 'निवडणूक आयोग चौकशी करणार का?'

Amravati Bachchu Kadu Prahar Janshakti Party CM Ladki Bahin Yojana crime Election Commission : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांची पडताळणीत अनेक लाभार्थींना अपात्र करण्याच्या कार्यवाहीवर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया.
Bachchu Kadu
Bachchu Kadu Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुती सरकारने माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या अर्जांच्या पडताळणीचा सपाटा लावला आहे. यातून लाखो लाभार्थी बहिणी अपात्र झाल्या आहेत.

काहींचे पैसे देखील परत जमा करायला सुरवात केली आहे, तर काही कारवाईच्या भीतीपोटी लाभ सोडत आहे. महायुतीच्या या योजनेवर आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे. माजी मंत्री प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील यावर निशाणा साधला आहे.

बच्चू कडू म्हणाले, "माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून (CM Ladki Bahin Yojana) अनेक महिला आता अपात्र ठरल्या जात आहेत". आता निवडणूक आयोगाने यावर पारदर्शकपण विचार करावा. ही योजना कशासाठी होती. याची चौकशी करणार का? आणि ती करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

Bachchu Kadu
Sanjay Raut : 'ते राजे आहेत, बोलण्यापेक्षा त्यांनी थेट पूर्तता करावी'; संजय राऊतांचा उदयनराजेंना टोला

'या योजनेत डायरेक्ट नेत्याच्या खिशातून पैसे न जाता बजेटमधून, सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मत ओढण्याचा प्रयत्न झाला आहे. ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हती, तर सत्तेत येण्यासाठी होती. सत्तेत येण्यासाठी करोडो लाडक्या बहिणीची चाचपणी न करता त्यांना पैसे देऊन टाकले', असेही बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी म्हटले.

Bachchu Kadu
Beed News : मंत्री धनंजय मुंडेंविरोधात दाखल याचिका घेतली मागे, काय आहे कारण...

'तुम्ही निकष न पाहता त्यांच्या खात्यात पैसे टाकले. मग आता म्हणता की त्या पात्र नाहीत, मग पैसे द्यायच्या अगोदर पात्र ठरवायचं की पैसे दिल्यावर पात्र ठरवायचं? हा मोठा प्रश्न आहे. हा क्राईम आहे, सरकारने गुन्हा केला आहे', असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला.

लाडक्या बहिणींनो रस्त्यावर उतरा

'महायुती सरकारने याच योजनेवर महिलांची मतं घेतली. मात्र आता त्यांचे पैसे बंद करणार ही त्यांची फसवणूक आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली त्या लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे', असेही बच्चू कडू यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com