Navneet Rana BJP : 'हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढ़ने वाली थोडे दिन की मेहमान... जल्दी उडाने वाले है'; भाजपच्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

Former BJP MP Navneet Rana Receives Death Threat Call From Pakistan Amravati Incident : अमरावतीमधील भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्यानं खळबळ उडाली आहे.
Navneet Rana BJP
Navneet Rana BJPSarkarnama
Published on
Updated on

Amravati MP Pakistan threat : भाजपच्या अमरावतीमधील माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याच्या धमकीचा काॅल आल्यानं खळबळ उडाली आहे.

'हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढ़ने वाली थोडे दिन की मेहमान.. जल्दी उडाने है वाले है', अशा पद्धतीच्या नवनीत राणा यांना धमक्या आल्या आहे. नवनीत राणा यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली असून, पोलिसांनी धमक्या नेमक्या कोठून येत आहेत, याचा शोध सुरू केला आहे.

भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या धमक्यांची पोलिसांनी गंभीर दखल घेत, तपास सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या नांदगावपेठ एमआयडीसी इथल्या रेडिमेड कपडे तयार कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या टेलरला थेट पाकिस्तानातून हा धमकीचा कॉल आला होता. देशाच्या दिल्लीत (Delhi) तीन ते चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकी दिली होती. यानंतर आता नवनीत राणा यांना धमकीचा काॅल आला आहे.

Navneet Rana BJP
Teacher Post Mapping : शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; बोगस शिक्षकांबरोबरच संस्थाचालकांच्या मनमानीला चाप बसणार

जम्मू-काश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय (India) लष्करानं 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत एअर स्ट्राइक करत, जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारत-पाकिस्तान हे दोन्ही देशाचे लष्कर आमने-सामने येत युद्ध परिस्थिती निर्माण झाली. पाच दिवसांपासून दोन्ही देशांच्या सीमांवर तणावाचे वातावरण आहे. 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी झाल्यानंतर नवनीत राणा यांनी पाकिस्तानला जोरदार उत्तर दिलं होतं. तसा त्यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर देखील व्हायरल झाला होता.

Navneet Rana BJP
Manoj Naravane: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्या हल्ल्यानंतर 'अभी पिक्चर बाकी है' म्हणणारे मनोज नरवणे आता काय म्हणाले?

नवनीत राणा यांनी, 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते. घरात घुसून कशाला मारणे म्हणतात, ते 'ऑपरेशन सिंदूर' आहे, असे म्हटले होते. घरात घुसून मारले आहे. कबर तुम्हारी खोदी है, इस देश मै दिल्ली की गद्दी पर हमारे मोदीजी बैठे है, पाकिस्तानने हे समजून घ्यावे. बकरे की आमा कब तक खैर मनाएगी, असा टोला लगावला होता.

'ऑपरेशन सिंदूर'च्या एअर स्ट्राइकमध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अजहर याचे संपूर्ण कुटुंब ठार झाले. यावेळी मसूद अजहर याने मी माझ्या कुटुंबाबरोबर गेलो असतो, तर बरं झालं असतं, असा म्हटल्याचे सांगितले जाते. याचा दाखला देताना, नवनीत राणा यांनी मोदींजींनी त्याची देखील कबर खोदून ठेवल्याचे म्हटले होते. दहशतवाद्यांना चुन चुन के मारेंगे, घर मे घुसके मारेंगे, असे मोदी यांनी म्हटले होते. अभी तो पिक्चर बाकी है, पाकिस्तान, असा इशारा देखील नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया देताना दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com