Amravati Graduate Election : रणजीत पाटलांनी धुळीस मिळवली देवेंद्र फडणवीसांची प्रतिष्ठा !

Dr. Ranjeet Patil : डॉ. रणजीत पाटील यांना पेंशनवर जाण्याची वेळ मतदारांनी आणली.
Dr. Ranjeet Patil and Devendra Fadanvis
Dr. Ranjeet Patil and Devendra FadanvisSarkarnama

Amravati Graduate Election Result : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात प्रस्थापित उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांचा पराभव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारा ठरला. जुनी पेंशन योजनेसोबतच असंघटित पदवीधर मतदारांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे डॉ. रणजीत पाटील यांना पेंशनवर जाण्याची वेळ मतदारांनी आणली.

सलग दोन टर्म अर्थात एक तप विधान परिषदेत अमरावती विभागातील पदवीधरांचे नेतृत्व करणा-या डॉ. पाटील यांचा विजय खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेचा केला होता. अमरावतीत त्यांनी जाहीर सभाही घेतली. भाजपचे संघटनात्मक जाळे मजबूत असल्याने विजय हमखास आपलाच आहे, या आविर्भावात त्यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते होते. मात्र अतिआत्मविश्वास नडण्यासोबतच त्यांनी पक्षांतर्गत असलेला नाराजीचा सुर ओळखण्यात चूक केली.

नाराजांवर दबाव आणून त्यांना कामाला लावण्याची त्यांची पद्धत यावेळी मात्र कामी आली नाही. गेल्या बारा वर्षांतील डॉ. रणजीत पाटील यांनी मतदारांसोबत जनसंपर्क न ठेवल्याचा रोष मतपेटीतून स्पष्ट दिसून आला. जुनी पेंशन योजना पदवीधर कर्मचा-यांसाठी जिव्हाळ्याचा मुद्दा होता. नेमक्या याच मुद्दयावर भाजपने स्पष्ट भूमिका न घेता आधी विरोध व नंतर सकारात्मकता दर्शवत मतदारांना आकर्षित करण्याची खेळी खेळली. मात्र ती फलदायी ठरली नाही.

भाजपने यापूर्वी दोन निवडणुका असंघटित पदवीधर मतांच्या भरवशावर जिंकल्या आहेत. हा अनुभव पाठीशी असतानाही संघटित मतदारांना आकर्षित करण्यावर भर देत नेमक्या याच मतदारांकडे त्यांनी दुर्लक्ष केले. संघटित मतदारांनी मात्र त्यांना पाठ दाखवत निकाल फिरविला. त्याचवेळी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार धीरज लिंगाडे यांची कोरी पाटी मतदारांना आकर्षित करणारी ठरली. कर्मचा-यांच्या जिव्हाळ्याच्या जुन्या पेंशन योजनेच्या मुद्दयाचा त्यांनी खुबीने व पुरेपूर वापर केला.

Dr. Ranjeet Patil and Devendra Fadanvis
Politics : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडतोय? खडसेंनी सांगितलं कारण

नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी धीरज लिंगाडे यांची उमेदवारी जाहीर झाली. प्रचाराला अल्पसा कालावधी मिळालेला असताना त्यांनी आघाडीतील सर्वांना सोबत घेत जनसंपर्कावर भर देत जागा भक्कम केली. चुरशीच्या लढतीतील दोन्ही उमेदवारांचे असंघटित पदवीधर मतदारांकडील दुर्लक्षाने मतदानाची टक्केवारी कमी झाली. त्याचा सर्वाधिक झटका डॉ. रणजीत पाटील यांना बसला तर, धीरज लिंगाडे यांचेही मताधिक्य कमी झाले.

असा व्यक्त केला मतदारांनी रोष..

अमरावती (Amravati) पदवीधर निवडणुकीत मतदारांचा डॉ. रणजीत पाटील यांच्यावरील रोष प्रकर्षाने दिसून आला. अवैध ठरलेल्या एकूण मतपत्रिकांपैकी पाच हजारांवर मतपत्रिकांवर पाटील यांच्या फोटोवर फुल्या मारण्यासोबतच काही मतदारांनी त्यांच्या नावासमोर २ चा आकडा टाकताना पहिल्या पसंतीचे मतच नोंदविले नाही. त्यामुळे मत देऊनही ते बाद ठरले. काही मतदारांनी त्यांच्या नावासमोर जुनी पेंशन (Old Pension) योजना लिहून संदेश देत रोष व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com