Amravati पदवीधर मतदारांच्या निरुत्साहाने टक्का घसरला, १२ जानेवारीपर्यंत नोंदणी सुरू..

Graduate Constituency : अमरावती विभागात आत्तापर्यंत १ लाख ८५ हजार ९२५ मतदारांची नोंदणी झाली आहे.
Amravati Graduate Constituency Elections
Amravati Graduate Constituency ElectionsSarkarnama

Amravati Graduate Constituency Elections : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांनी नोंदणीसाठी निरुत्साह दाखविल्याने यावेळी नोंदणी कमी झाली आहे. मात्र १२ जानेवारीपर्यंत मतदार नोंदणी सुरू असल्याने पुरवणी यादीमध्ये मतदार संख्येत वाढ होऊ शकते. यासाठी प्रशासन आणि उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते प्रयत्नरत आहेत.

अमरावती (Amravati) विभागात आत्तापर्यंत १ लाख ८५ हजार ९२५ मतदारांची नोंदणी झाली आहे. १२ जानेवारीपर्यंत नोंदणी सुरू असल्यामुळे मतदार संख्या वाढेल, अशी माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक (Election) निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ३० जानेवारीला होत आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले. नामनिर्देशन सुरू झाले असून गुरुवारी पहिल्या दिवशी १२ जणांनी उमेदवारी अर्ज उचलले असून अद्याप एकही नामांकन दाखल झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण १ लाख ८५ हजार ९२५ मतदार पात्र ठरले आहेत. सर्वाधिक मतदारसंख्या अमरावती जिल्ह्याची ५६,६२९ आहे. वाशीम जिल्ह्यात सर्वात कमी १५,०४४ मतदार आहेत. १२ जानेवारीपर्यंत नोंदणी सुरू राहणार असल्याने मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विभागात २६२ मतदान केंद्रे राहणार असून मतमोजणी अमरावतीला करण्यात येणार आहे. त्यासाठी अद्याप केंद्र निश्चित झालेले नाही. मतमोजणीचे प्रशिक्षणही येथे देण्यात येणार आहे. पसंतीक्रमाने मतदान असल्याने मतदान कसे करावे, याचा डेमो देण्यात येणार आहे. प्रचारासाठी रात्री १० वाजेपर्यंत मुभा आहे. कोविड बाधित रुग्णांना पोस्टल व्होटिंगची सुविधा देण्यात येणार आहे. यावेळी होत असलेल्या निवडणुकीत विभागातील मतदारांची संख्या २४ हजार ६८६ ने कमी आहे. वर्ष २०१७ मध्ये २ लाख १० हजार ५११ मतदार होते.

Amravati Graduate Constituency Elections
Amravati : अमरावती ‘पदवीधर’ निवडणूक: भाजपची तयारी जोरात, कॉंग्रेस स्वबळावर...

जिल्हानिहाय मतदार संख्या (वर्ष २०१७ ची संख्या)

अमरावती : ५६६२९ (७६,६७९)

अकोला : ४४५०६ (४७१८६)

बुलढाणा : ३६४९७ (३४९१९)

वाशीम : १५०४४ (१८,७३६)

यवतमाळ : ३३२४९ ( ३४९१९)

बारा जणांकडून अर्जाची उचल..

पांडुरंग ठाकरे (वाशीम), भारती दाभाडे (अकोला आप), अनिल ठवरे (अमरावती), अ‍ॅड. धनंजय तोटे (अमरावती), शरद झामरे (अकोला), विद्याधर मेटकर (अमरावती), संदीप गावंडे (अमरावती), अरुण सरनाई (वाशीम), किरण चौधरी (वाशीम प्रहार), परेश पाटील (वाशीम प्रहार), वैभव चौधरी (वाशीम)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com