Amravati Lok Sabha Constiruency : लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये अजूनही सहा ते सात जागांवर पेच सुरू आहे. त्यातील एक आणि महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे अमरावती. येथेही अद्याप काही ठरलेले नाही. काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे लढणार, हे निश्चित झाले आहे. पण महायुतीचे भिजत घोंगडे कायम आहे. अमरावतीची जागा भाजप कमळ या चिन्हावरच लढणार, हे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. पण उमेदवार कोण, याबद्दल अजूनही काही स्पष्टता नाही.
नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्येही उमेदवारीचा पेच कायम आहे. यासंदर्भात आज (ता. 23) नागपुरात बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, रामटेक गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे, सध्याही रामटेकमध्ये शिवसेनेचे खासदार आहेत. या जागेबाबत लवकरच निर्णय होईल. आज आमची CEC बैठक आहे. ,ज्या 5 जागा भाजपकडे आहेत त्यावर आज चर्चा होणार आहे. संजय राऊत यांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली, त्यावर संजय राऊतांसारख्या लोकांना जनता धडा शिकवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका त्यांनी केली. त्यांना जनता मतांतून उत्तर देईल, असे ते म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अजूनही 6 ते 7 जागांवर पेच आहे, त्यावर लवकर निर्णय होईल. उदयनराजे यांची साताऱ्याची मागणी आहे. त्यावर महायुतीचे नेते निर्णय घेतील. जिंकण्याकरिता आवश्यक बाबी आहेत, त्यावर उमेदवार निश्चित करण्यात येत आहेत. दक्षिण मुंबईबाबत एकनाथ शिंदे निर्णय घेतील. आढळराव पाटील यांचं काही ठरले असेल म्हणून ते राष्ट्रवादीत प्रवेश करत असतील कदाचित, असे बावनकुळे म्हणाले. संभाजीनगरच्या तिढ्याबाबत विचारले असता, संभाजीनगरबाबत तिढा नाही, तर चर्चा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
अमरावतीमध्ये नवनीत राणा की आणखी कुणी, या प्रश्नावर त्यांनी अतिशय सावध उत्तर दिले. भाजपमध्ये कोण प्रवेश करणार किंवा नाही, हे सध्यातरी निश्चित नाही. पण येथे सर्वांची मदत घेऊ. प्रतिष्ठेप्रमाणे सर्वांना तिकीट दिले जातील. सर्वांचा सन्मान ठेवण्यात येईल. राजकारण करताना काही मतभेद होत असतात.
बच्चू कडू किंवा अडसूळ यांच्यात मतभेद झालेही असतील. मात्र, देशात मोदी प्रधानमंत्री व्हावे, यासाठी बच्चू कडू, अडसूळ यांच्यासह सगळे प्रयत्न करतील. बच्चू कडू आमच्यासोबत राहतील. मनसे किंवा इतरांमुळे उमेदवार जाहीर करण्यास वेळ होत असल्याचा त्यांनी इन्कार केला. एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते लढणार नाहीत. रक्षा खडसे या सीटिंग खासदार आहेत आणि त्यांनी 10 वर्षे चांगले काम केले असल्याचे बावनकुळे म्हणाले.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.