Balwant Wankhade News: पठ्ठ्यानं चक्क स्टॅम्प पेपरवर लिहून दिला शपथनामा; निवडून आल्यावर कोणती विकासकामे करणार...

Amravati Lok Sabha Constituency 2024: निवडणुका जाहीर झाल्यावर पक्षांनी आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. अशाच प्रकारचा शपथनामा वानखेडेंनी जाहीर केला आहे. निवडून आल्यानंतर काय विकासकामे करणार, याबाबतची माहिती त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिली आहे.
Balwant Wankhade News
Balwant Wankhade NewsSarkarnama

अमरावती लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून (Amravati Lok Sabha Constituency 2024) काँग्रेसचे बळवंत वानखडे (Balwant Wankhade) हे निवडणूक लढवत आहेत. बळवंत वानखेडे हे सध्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

निवडणुका जाहीर झाल्यावर पक्षांनी आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. अशाच प्रकारचा शपथनामा वानखेडेंनी जाहीर केला आहे. निवडून आल्यानंतर काय विकासकामे करणार, याबाबतची माहिती त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिली आहे.

Amravati News: लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडीचे उमेदवार (Mahavikas Aghadi Candidate Balwant Wankhade) बळवंत वानखडे यांनी जनतेची कोणकोणती कामे आपण करणार आहोत, याचा शपथनामा चक्क शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून जनतेसमोर ठेवला आहे. त्यामुळे हा जाहीरनामा चर्चेचा विषय ठरला आहे.

असा आहे बळवंत वानखेडेंचा शपथनामा

  • शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी संसदेत आवाज उठवून शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी कटिबद्ध राहील

  • पांदण रस्ते, संत्राफळांच्या प्रक्रिया केंद्राची निमिर्तीसाठी पुढाकार घेऊन ५० हजार लोकांना रोजगार देणार

  • जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या उद्योगांमध्ये ७० टक्के स्थानिकांना रोजगार मिळवून देणार

  • मूळ निवासी असलेल्या आदिवासींच्या जमिनीवर होणारे अतिक्रमण रोखणार

  • त्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर कायमस्वरूपी राहण्याचा अधिकार मिळवून देणार

  • प्रत्येक तालुक्यात डिजिटल लायब्ररी उभारणार

  • महिलांना शहरात मोफत बससेवा

  • प्रत्येक तालुक्यात फिरते आरोग्य केंद्र उभारणार

  • R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com