Amravati News: नवनीत राणा (Navneet Rana) या अमरावती लोकसभा मतदारसंघातून (Amravati Lok Sabha election 2024) कमळ चिन्हावर लढण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या अधिकृत पक्ष प्रवेशावर नवनीत राणा यांनी अमरावतीत नूकतेच सूचक वक्तव्य केले आहे. 'लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच त्यावर कोणीही डाऊट घेऊ नये,' असं त्यांनी म्हटलं आहे. अशातच आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी स्थानिक एनडीएच्या नेत्यांना सज्जड दम भरला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
"जे लोकं एनडीए च्या घटक पक्षाचं इमानदारीने पालन करणार नाहीत, त्यांना एनडीएच्या माध्यमातून कारवाई करायला लावू," असा इशारा आमदार रवी राणा यांनी स्थानिक अमरावती जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांना दिला आहे. "येणाऱ्या काळात सगळे एनडीएचे घटक खासदार नवनीत राणा यांच्या मंचावर दिसतील. एनडीएचे घटक म्हणून खासदार नवनीत राणा यांचा प्रचार करतील. काही कार्यकर्त्यांनी जर पक्षाच्या विरोधात जाऊन प्रचार केला तर त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार आहे," असा दम रवी राणा यांनी स्थानिक नेत्यांना भरला.
"भाजप प्रवेशावर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल. आम्ही एनडीएमध्ये आहोत. जी माहिती पक्षश्रेष्ठींकडून आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची चर्चा झाली असून आम्ही जो निर्णय घेऊ त्यावर आमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस नेहमी राहतील," असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.
नवनीत राणांना भाजपचं तिकीट मिळणार असल्याचे चर्चा आहे. याबाबत नवनीत राणांनी देखील त्याचे संकेत दिले आहेत. पण त्यांच्याविरोधात महायुतीतील काही नेत्यांनी त्यांना थेट आव्हान दिले आहे. अमरावतीची जागा शिंदे गटाचीच असून आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ येथून लढणार आणि जर भाजपकडून राणांना उमेदवारी मिळाली तरी स्वतः अपक्ष म्हणून लढणार, असा निर्धारच त्यांनी व्यक्त केला.
अमरावतीमध्ये नवनीत राणांचे राजकीय विरोधक हे अभिजीत अडसूळ आहेत. २०१९ अभिजीत अडसूळ यांचा दारूण पराभव करून नवनीत राणा या खासदार झाल्यात त्यामुळे यंदा कुणाला तिकीट मिळणार हे लवकरच समजेल.नवनीत राणा भाजप सोबत जाणार की नाही या विषयी अनेक तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांना मात्र नवनीत राणा यांना तिकिट दिल्यास धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.