Amravati Instagram murder : इन्स्टाग्रामवरील वादातून युवकाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजा छाटला, ताब्यात घेतलेल्य चौघांपैकी तिघे अल्पवयीन

24-year-old killed in Amravati after alleged Instagram dispute; four detained : अमरावती शहरातील राजेंद्र कॉलनी परिसरात भररस्त्यात हल्ला; सीसीटीव्ही आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू, आठ जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज.
Amravati Instagram murder
Amravati Instagram murderSarkarnama
Published on
Updated on

Youth murdered in Amravati : अमरावती शहरातील राजेंद्रनगर कॉलनी परिसरात इन्स्टाग्रामवरील वादातून 24 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली.

शेख अफाक शेख अकील (वय 24, रा. ताजनगर) असे मृत युवकाचे नाव असून, त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक आणि आरोपी यांच्यात इन्स्टाग्राम चॅटिंगवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही बाजूंनी अमरावतीच्या (Amravati) राजेंद्रनगर काॅलनी भेट झाली होती. मात्र, चर्चेदरम्यान पुन्हा वाद उफाळून आला आणि त्यानंतर शेख अफाक याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.

या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी तिघे अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी (Police) दिली आहे. पोलिस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात एकूण आठ जणांचा सहभाग असल्याचा प्राथमिक अंदाज असून, उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

Amravati Instagram murder
Shrirampur Crime : "मला हत्यार द्या, मीच एन्काउंटर करतो..."; आकाश दुबय्याच्या वडिलांचा आक्रोश, बेग गँगवर गंभीर आरोप

घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यामध्ये हल्लेखोर शस्त्राने हल्ला करताना दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सीसीटीव्ही आणि अन्य डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून, सर्व संबंधितांची भूमिका तपासली जात आहे.

Amravati Instagram murder
live in relationship murder : ‘मी जंगलात मृतदेह जाळला...’ अर्ध्या रात्री मित्राला Video Call; पुढे थरारक घटनाक्रम, बाप-लेक अटकेत

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आणि तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील नेमकी पार्श्वभूमी व कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com