live in relationship murder : ‘मी जंगलात मृतदेह जाळला...’ अर्ध्या रात्री मित्राला Video Call; पुढे थरारक घटनाक्रम, बाप-लेक अटकेत

Boyfriend brutally kills 17-year-old minor girlfriend Shrigonda over character suspicion, attempts burn body with father help : अहिल्यानगरातील मित्राला फोन करून दिली धक्कादायक माहिती; श्रीगोंद्यात घराला घेराव घालून शुभम ओव्हळ आणि वडिलांना पोलिसांनी अटक केली.
live in relationship murder
live in relationship murder Sarkarnama
Published on
Updated on

Shrigonda murder case : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन प्रेयसीचा चारित्र्याच्या संशयातून प्रियकराने लोखंडी रॉड आणि फरशीने ठेचून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे.

एवढ्यावरच न थांबता आरोपीने आपल्या वडिलांच्या मदतीने मृतदेह जंगलात नेऊन जाळण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम सुखदेव ओव्हळ याने मंगळवारी मध्यरात्री सुमारास अहिल्यानगर येथील आपल्या मित्राला व्हिडीओ कॉल करून आपण वडाळी रोडलगतच्या जंगलात मृतदेह जाळल्याचे सांगितले. हा धक्कादायक प्रकार कळताच मित्राने तातडीने कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेत माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी श्रीगोंदा पोलिसांना सतर्क केले.

श्रीगोंदा (Shrigonda) पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तातडीने आरोपीच्या काळकाई चौकातील घराभोवती सापळा रचत शुभम ओव्हळ आणि त्याचे वडील सुखदेव ओव्हळ या दोघांना अटक केली. चौकशीत आरोपींनी धक्कादायक गुन्ह्याची कबुली दिली.

live in relationship murder
Pathardi Gangrape Case : पाथर्डीत गँगरेप, पीडितेचं थेट पोलिस ठाण्यासमोर टोकाचं पाऊल; गोंधळात साथीदाराचा मृत्यू, 16 जणांवर अखेर गुन्हा

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुमारे वर्षभरापूर्वी शुभम आणि पीडित अल्पवयीन मुलीची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. गेल्या तीन महिन्यांपासून दोघे श्रीगोंद्यातील काळकाई चौक परिसरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र शुभमला तिच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणावरून तो वारंवार तिच्यासोबत भांडण करत होता आणि तिला मारहाणही करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

live in relationship murder
Female Lawyer Suicide Case : गेट वे ऑफ इंडियाजवळ सापडला महिला वकिलेचा मृतदेह; 40 कोटींच्या डीलमागील गूढ? ज्येष्ठ विधिज्ञाभोवती कारवाईचा फास

या आधीही पीडित मुलीच्या आईने एक महिन्यापूर्वी शुभम आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या वेळी शुभमने हे प्रकरण मिटवले होते. सोमवारी दुपारी दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. संतापाच्या भरात शुभमने लोखंडी रॉडने प्रेयसीच्या डोक्यावर वार केले आणि फरशीने ठेचून तिचा जागीच खून केला. त्यानंतर त्याने अहिल्यानगरमधील मित्राला फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला.

गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मंगळवारी रात्री शुभम आणि त्याचे वडील सुखदेव यांनी वडाळी रोडलगतचे जंगल निवडले. मध्यरात्रीनंतर मृतदेह गादीमध्ये गुंडाळून मोटारसायकलवर नेण्यात आला. जंगलात पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मित्राने पोलिसांना माहिती दिल्यानंतर संपूर्ण कट उघडकीस आला.

या प्रकरणी मृत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी आरोपी शुभम ओव्हळ, त्याचे वडील सुखदेव ओव्हळ आणि आई रेखा ओव्हळ यांच्याविरोधात हत्या,पॉक्सो आणि अ‍ॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पीडित मुलगी अल्पवयीन असून मागासवर्गीय प्रवर्गातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या निर्घृण हत्याकांडामुळे श्रीगोंदा आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, प्रेमसंबंधातून सुरू झालेलं नातं इतक्या भयानक शेवटाला गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com