Amravati Politics News : अमरावती जिल्ह्यातील ‘त्या’ दोन आमदारांमध्ये पुन्हा कडवटपणा !

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे गट आणि आमदार रवी राणा यांच्यातही हाणामारीपर्यंत प्रकरण पोहोचले आहे.
Bacchu Kadu and Ravi Rana
Bacchu Kadu and Ravi RanaSarkarnama

Amravati Political News : अमरावती जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीकडे सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. खासदार नवनीत राणा आणि अनेक नेत्यांमध्ये सध्या वाद रंगत आहे. आता राणा आणि अमरावती जिल्ह्यातील आणखी एका नेत्यामध्ये कडवटपणा निर्माण झाला आहे. (The matter has also reached a clash between Uddhav Thackeray group and MLA Ravi Rana)

युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या खासदार नवनीत राणा व काँग्रेस नेत्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्यात राजकीय वाद पेटला आहे. उद्धव ठाकरे गट आणि आमदार रवी राणा यांच्यातही हाणामारीपर्यंत प्रकरण पोहोचले आहे. अशात प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याचा आमदार रवी राणा यांनी समाचार घेतला. त्यामुळे आमदार राणा व आमदार कडू यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत (Election) कुणी पैसे वाटले व कुणी पैसे घेतले, याची चौकशी होणे गरजेचे आहे. आपण यासंदर्भात पोलिस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी स्पष्ट केले होते. कडू यांच्या या वक्तव्यानंतर आमदार राणा (Ravi Rana) यांनी त्यांच्यावर टीका केली. आमदार बच्चू कडू म्हणजे मंत्रिपदासाठी सरकारला ब्लॅकमेल करणारा नेता असल्याची टीका आमदार राणा यांनी केली आहे. ‘मला आवर घालण्याचा सल्ला देण्यापेक्षा बच्चू कडू यांनी स्वत:ला आवर घालावा’, असे आमदार राणा यांनी म्हटले आहे.

भाजपसोबत असलेल्या आमदार रवी राणा यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर घालावी, असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी दिला. त्यावर आमदार राणा चांगलेच संतापले. ‘देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी गेल्या ११-१२ वर्षांपासून आहे. ते सरकारमध्ये असताना आणि विरोधात असतानाही मी त्यांच्यासोबत होतो. आम्ही सुख-दुःखात सोबत राहणारे लोक आहोत. पळ काढणारे नाही.

बच्चू कडू यांनी जो सल्ला दिला आहे. जे नेहमी पाला बदलत असतात, त्यांनी सल्ला देण्याचं काम करू नये’, अशी टीका राणा यांनी केली. निवडणूक जवळ आल्यानंतर सगळे नेते एकत्र येऊन आपल्याला पराभूत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपण जनतेच्या मनात राहतो. जनता आपल्यासोबत आहे. त्यामुळे आपला नेहमीच विजय होतो, असेही राणा यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने खऱ्या अर्थाने बच्चू कडू यांना आवर घालण्याची गरज आहे. त्यांना केवळ मंत्रिपद हवे आहे, हे त्यांच्या बोलण्यावरून व वागण्यावरून स्पष्ट दिसते. मध्यंतरीच्या काळात त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे ते मंत्रिपदासाठी किती हपापले आहेत, याची कल्पना येते. त्यामुळे खऱ्या अर्थाने बच्चू कडू यांना आवर घालण्याची गरज असल्याचे आमदार राणा म्हणाले. आपल्याविरुद्ध आतापर्यंत अनेक कट-कारस्थाने झालीत. परंतु आपण कुणालाही घाबरत नाही, असे राणा यांनी स्पष्ट केले.

Edited By : Atul Mehere

Bacchu Kadu and Ravi Rana
#Short : 'गुवाहटीला गेलो आणि बदनाम झालो' | Bacchu Kadu | #Short #BachchuKadu #CMeknathShinde

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com