Amravati Rana News : राणा दाम्पत्याला हनुमान भक्तीचा प्रसाद तर द्यायचा, पण कसा? भाजपसमोर पेच !

Navnit and Ravi Rana : राणा दाम्पत्याने रामदूत हनुमानाला अनोखी भेट अर्पण केली आहे.
Ravi and Navnit Rana
Ravi and Navnit RanaSarkarnama
Published on
Updated on

Amravati City Political News : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना हनुमान चालिसा पठणाच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्रासून सोडणाऱ्या अमरावतीच्या भैय्या आणि भाभीने अर्थात आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी रामदूत हनुमानाला अनोखी भेट अर्पण केली आहे. या भेटीची सध्या अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. (The Rana couple has offered a unique gift to Lord Hanuman)

हनुमान भक्तीच्या बदल्यात राणा दाम्पत्याला काय हवे आहे, ही बाब भाजपपासून लपलेली नाही. भाजपच्या स्थानिक प्रस्थापित नेत्यांना बाजूला करीत राणा दाम्पत्याला त्यांच्या हनुमान भक्तीचा प्रसाद कसा द्यायचा, असा पेच सध्या भाजप पुढे आहे. असे असले तरी राणा दाम्पत्य आपल्या हनुमान भक्तीत लीन आहेत. आपल्या भक्तीचे फळ देत कधी ना कधी पवनपुत्र मारुतीराय त्यांना इच्छित फळ नक्की प्रदान करेल, असा विश्वास राणा व त्यांच्या समर्थकांनाही आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दहा एकर जमीन संस्थेला दान

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात हनुमान चालिसा पठाणाची मोहीम राबवल्याने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व बडनेराचे आमदार रवी राणा यांना भाजपचा राम चांगलाच पावला आहे. आता राज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार या महायुतीचे सरकार सत्तेवर असले तरी राणा दाम्पत्याने अद्यापही महाबली हनुमंताचे चरण सोडलेले नाही.

अमरावतीमध्ये प्रस्तावित असलेल्या अशाच १११ फूट भव्य हनुमान मूर्ती उभारणीसाठी राणा दाम्पत्याने दहा एकर जागा एका संस्थेला दान दिली आहे. अमरावतीमधील हनुमान चालिसा ट्रस्ट नामक संस्था या भव्य हनुमान मूर्तीची उभारणी करणार आहे. अमरावती शहराच्या जवळच असलेल्या छत्री तलाव परिसरात ही हनुमानाची मूर्ती उभारली जाणार आहे.

हनुमंताची भव्य मूर्ती उभारली जाणार

या मूर्तीसाठी हनुमान चालिसा ट्रस्टला मोठी जागा लागणार होती. त्यापैकी दहा एकर जागा राणा दाम्पत्याने ट्रस्टला उपलब्ध करून दिली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उपनिबंधक कार्यालयात हजेरी लावत ही जागा हनुमान चालिसा ट्रस्टच्या नावाने केली.

आम्हाला मिळालेल्या मानधनातून हनुमंतासाठी दहा एकर जागा उपलब्ध करून देत असल्याची माहिती, खासदार नवनीत राणा यांनी यावेळी दिली. ही जागा ट्रस्टला उपलब्ध झाल्यामुळे अमरावती शहरात भव्य दिव्य हनुमंताच्या मूर्तीची उभारणी पूर्ण होऊ शकेल, असे त्या यावेळी म्हणाल्या.

Ravi and Navnit Rana
Navnit Rana Bullet Ride : रामनवमीनिमित्त नवनीत राणांची बुलेट स्वारी, पाहा खास फोटो!

गेल्या अनेक दिवसांपासून राणा दाम्पत्य भारतीय जनता पार्टीच्या गळ्यातील ताईत बनले आहे. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी राबवलेल्या हनुमान चालिसा पठण मोहिमेमुळे भाजप त्यांच्यावर खूश आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दोघांपैकी कुणालाही एकाला राज्यात किंवा केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवायचे आहे, हे जगजाहीर आहे. परंतु अद्यापपर्यंत राणा दाम्पत्याने स्वतःहून अशा कोणत्याही पदाची मागणी भाजपकडे केलेली नाही.

Edited By : Atul Mehere

Ravi and Navnit Rana
Ravi Rana on Sharad Pawar: शरद पवार मोदींना पाठिंबा देणार... ; आमदार रवी राणांचे भाकीत, राजकारणात काहीही शक्य...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com