Amravati Double Murder : अमरावतीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड! घरातून बोलावून नेले अन् बसस्थानकाजवळ दोन मित्रांची चाकूने निर्घृण हत्या

Two youths killed in a brutal attack; five accused arrested in Amravati's Walgao : वलगावमध्ये जुन्या किरकोळ वादातून सहा युवकांचा जीवघेणा हल्ला; संजोग जोशी आणि ऋतिक पंडित यांचा जागीच मृत्यू, पाच आरोपी अटकेत, आणखी एकाला पोलिसांचा शोध
Amravati Double Murder
Amravati Double MurderSarkarnama
Published on
Updated on

Amravati crime news : अमरावती जिल्ह्यातील वलगाव मध्यरात्री दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला. वलगाव बसस्थानक परिसरात सहा युवा हल्लेखोरांनी दोन युवकांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे.

जुन्या परंतु किरकोळ कारणातून या हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. पाचही युवा हल्लेखोरांना पकडत पोलिसांनी अटक केली आहे.

संजोग जोशी (वय 24) आणि ऋतिक पंडित (वय 25) अशी हत्या (Murder) झालेली युवक आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास हे दोघे वलगाव बसस्टँड परिसरात असताना सहा जणांच्या युवा टोळक्याने त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला. हा हल्ला इतका भयानक आणि क्रूर होता की, संजोग आणि ऋतिक या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अत्यंत किरकोळ आणि जुन्या वादातून ही हत्या झाली आहे, अशी प्राथमिक माहिती अमरावती (Amravati) पोलिसांकडून मिळाली. हल्ला करणारे सहा जणांचे टोळके देखील वय वर्षे 25च्या आसपास आहे. युवकांकडून अशी हत्या होण्याच्या घटनेने पालकांमध्ये चिंतेची वातावरण आहे. या हत्येमागे नेमके काय कारण होते, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Amravati Double Murder
Shirdi Fruit Vendor Murder : शिर्डीच्या साई मंदिरासमोर महिलेची निर्घृण हत्या; 'लोक बघत राहिले, कुणी पुढे का आले नाही?' विखे पाटलांचा संताप

गोलू विकास उगले उर्फ विकी (वय 21), मिलन गोपालराव तायडे (वय 21), अजय दिलीपराव नागदिवे (वय 21), अनिकेत विशाल मेश्राम (वय 25) व सुमित सुधाकर सुरजुसे (वय 19, सर्व रा. वलगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अमरावतीचे पोलिस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी, हल्लेखोर सहा युवक असून, सर्व युवकांना ताब्यात घेत अटक केली आहे. किरकोळ कारणातून हे हत्याकांड झाल्याचे सांगितले जाते, अशी माहिती दिली.

Amravati Double Murder
Amravati murder : Instagram वरील वादाचा रक्तरंजित शेवट! युवकाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजा छाटला

असा आहे घटनाक्रम

संजोग आणि ऋतिक हे दोन्ही मित्र वलगाव बस स्टँड परिसरात थांबले होते. या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या चार युवकांसोबत त्यांची जुन्या कारणावरून बाचाबाची सुरू झाली. पुढे झटापट सुरू झाली. आपल्याजवळील धारदार शस्त्र व चाकू काढून एका युवकावर वार केले. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या मित्रावरही हल्लेखोरांनी बेछूट वार केले. यात दोघांचा मृत्यू झाला. हल्लानंतर सर्व आरोपी पसार झाले होते.

संजोग व ऋतिक घरातून नेले

संजोग जोशीच्या आजीने वलगाव ठाण्यात तक्रार दिली आहे. संजोग आणि ऋतिक घरी होते. त्यावेळी आरोपी गोलू उगले, मिलिंद तायडे, अजय नागदिवे व सुमित सुरजुसे त्यांच्या घरी आले आणि ते संजोग व ऋतिकला सोबत घेऊन गेले. आजीने हटकले असता 'थोड्या वेळात आम्ही परत येतो' असे गोलू उगले म्हणाला. यानंतर रात्री साडेअकरा वाजता दोघांच्या हत्येची धक्कादायक माहिती समोर आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com