Narendra Modi, Amruta Fadnavis
Narendra Modi, Amruta FadnavisSarkarnama

Amruta Fadnavis : महात्मा गांधी जुन्या तर नरेंद्र मोदी नवीन भारताचे राष्ट्रपिता..!''

Amruta Fadnavis : मी जास्त बोलले तर माझे आणि देवेंद्र आम्हा दोघांचेही नुकसान होते...
Published on

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या विधानांमुळे काहीवेळा त्या अडचणीत देखील येत असतात. आता अमृता फडणवीस या पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देशाचे दोन राष्ट्रपिता असून एक महात्मा गांधी तर दुसरे नरेंद्र मोदी हे आहेत असं विधान केलं आहे.

अमृता फडणवीस या नागपूर येथे अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे आयोजित अभिरूप न्यायालयात कार्यक्रमात उपस्थित होत्या. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. फडणवीस म्हणाल्या, आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता असून महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.

Narendra Modi, Amruta Fadnavis
GramPanchayat Election : जॉर्जियातील उच्चशिक्षण सोडून, थेट गावात सरपंचपदी : तरूणीचा थक्क करणारा प्रवास!

मी जास्त बोलले तर माझे आणि देवेंद्र आम्हा दोघांचेही नुकसान होते, ही बाब मला कळून चुकली आहे. याचा फायदा अनेकांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घेतला आहे. मी खूप बोलते अशी तक्रार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे करण्यात आली होती हे खरे आहे. पण मी आहे तशी आहे. प्रतिमा तयार करण्यासाठी मी काही बदल केले नाही असं देखील यावेळी त्या म्हणाल्या.

Narendra Modi, Amruta Fadnavis
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीत खटके ? शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

मी स्वत:हून कधीही राजकीय वक्तव्य करत नाही, मला त्यात रसही नाही. माझ्या वक्तव्यावर सामान्य लोक मला ट्रोल करीत नाही. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे ते जल्पक असतात. त्यांना मी फारसे महत्त्व देत नाही व घाबरतही नाही. मी फक्त माझ्या आई व सासूबाईंना घाबरते असेही अमृता फडणवीसांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com