Nagpur ZP : चहा न मिळाल्यानं डॉक्टर संतापले, भूल दिलेल्या चार महिलांना ऑपरेशन थिएटरमध्ये सोडून पळाले

Investigation Started : तीन सदस्यीय समिती करणार नागपूर जिल्ह्यातील अजब प्रकाराची चौकशी
Person Giving Information at Khat Hospital in Nagpur
Person Giving Information at Khat Hospital in NagpurSarkarnama
Published on
Updated on

Gameplay of the Health System : राज्यातील आरोग्य यंत्रणा सध्या रुग्णांच्या मृत्यूमुळे चांगलीच चर्चेत आलीय. विरोधकांनी सरकारच्या आरोग्य खात्यावर टीकेची झोड उठवलीय. अशात केवळ एक कप गरम चहा न मिळाल्यानं नागपूर जिल्ह्यातील एक डॉक्टर शासकीय इस्पितळातून पळून गेला. हा डॉक्टर नुसताच पळाला नाही, तर शस्त्रक्रिया करण्यासाठी अॅनेस्थिशिया दिलेल्या चार महिलांना ऑपरेशन थिएटरमध्ये सोडून त्यानं पळ काढल्यानं जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडालीय. डॉक्टर साहेबर गायब झाल्यानं प्रशासकीय यंत्रणेनं ऐनवेळी धावाधाव करीत पर्यायी डॉक्टरची व्यवस्था केली व शस्त्रक्रिया पार पडल्या.

डॉक्टरनं केलेल्या या कृत्याची चौकशी जिल्हा परिषदेनं सुरू केलीय. यासाठी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आलीय. हलगर्जीपणा केल्यामुळं आता या डॉक्टरवर कारवाईची टांगती तलवार आहे. (An Incident in Nagpur District where angry Doctor left Four Women in the operation theater after Giving them Anesthesia just for a cup of tea)

यासंदर्भात जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मौदा तालुक्यातील खात येथील शासकीय रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यासाठी रामटेक तालुक्यातील डॉ. तेजराम भलावी यांची ड्यूटी लावण्यात आली होती. ठरल्याप्रमाणं डॉ. भलावी हे दवाखान्यात पोहोचले. त्यांनी परिचारिकांच्या मदतीनं चार महिलांना अॅनेस्थिशिया दिला. महिलांना बधिरता जाणवायला लागली. अशातच डॉक्टर साहेब दवाखान्यातील कर्मचाऱ्यांवर संतापले.

सकाळपासून दवाखान्यात राबत असतानाही कुणी आपल्याला साधा एक कप चहा विचाराला नाही, याचा डॉक्टरांना संताप आला. वारंवार सांगूनही चहा काही लवकरच आला नाही, त्यामुळं डॉक्टरांचा पारा अधिकच चढला. अशात डॉक्टर अॅनेस्थिशिया दिलेल्या त्या चारही महिलांना ऑपरेश थिएटरमध्येच सोडून दवाखान्यातून निघून गेले. बराच वेळ झाला, तरी डॉक्टर आले नाहीत, त्यामुळं शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिला व त्यांच्या नातेवाइकांची चौकशी केली. त्यावेळी डॉक्टर रुग्णांना तसेच सोडून निघून गेल्याचं त्यांना सांगण्यात आलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बघता बघता या प्रकाराची चर्चा गावभर पसरली. पंचायत समिती सभापती स्वप्नील श्रावणकर, जिल्हा परिषद सदस्य राधा अग्रवाल याही खात रुग्णालयात पोहोचल्या. चौकशी केल्यानंतर त्यांना दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी घडलेला प्रकार सांगितला. सारं प्रकरण कळल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीनं या प्रकाराची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांना दिली. प्रकरण वरिष्ठांपर्यंत गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी धावाधाव करीत पर्यायी डॉक्टरची व्यवस्था केली.

पर्यायी डॉक्टर खात रुग्णालयात पोहोचल्यानंतर चारही महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तोवर या महिलांना आहे, त्याच पद्धतीनं रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या या हलगर्जीपणामुळं मोठा वादंग जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या वर्तुळात झाला. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. आता तीन सदस्यीय समिती या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे.

Edited By : Atul Mehere

Person Giving Information at Khat Hospital in Nagpur
Gadkari & Fadnavis on Nagpur Flood : गडकरी म्हणाले, अंबाझरी कुणाचं बाळ, सगळे विभाग घेताहेत एकमेकांवर आळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com