वाळूच्या ट्रॅक्टरवर कार धडकली, भाजपचे युवा नेते आनंद गण्यारपवार ठार...

भाजपचे (BJP) युवा नेते, जिल्हा सचिव तथा 'मन की बात' कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक आनंद गण्यारपवार अपघातात ठार झाले.
Accident, Gadchiroli
Accident, GadchiroliSarkarnama
Published on
Updated on

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्हा परिषदेचे सदस्य तथा चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे (APMC) सभापती अतुल गण्यारपवार व त्यांचे बंधू भाजपचे (BJP) युवा नेते, जिल्हा सचिव तथा 'मन की बात' कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक आनंद गण्यारपवार आज सकाळी चामोर्शीवरून नागपूरला (Nagpur) जात होते. ६:४५ ते ७:०० वाजताच्या दरम्यान चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याच्या ब्रह्मपूरी तालुक्यातील रणमोचन फाट्यावर गण्यारपवार यांची कार हायवेवर येत असलेल्या वाळूच्या ट्रॅक्टरला धडकली. या अपघातात आनंद गण्यारपवार यांचा मृत्यू झाला. तर अतुल गण्यारपवार यांना गंभीर दुखापत झाली आहे. ते धोक्याच्या बाहेर आहेत.

प्राप्त माहितीनुसार गण्यारपवार बंधू काही कामानिमित्त मुंबईला जाणार होते. नागपूरहून सकाळची फ्लाईट पकडण्यासाठी दोघेही भल्या पहाटे चामोर्शीहून नागपूरला जाण्यासाठी रवाना झाले. यादरम्यान ब्रह्मपूरी तालुक्यातील रणमोचन (खरकाडा) फाट्याजवळ अचानक हायवेवर येत असलेल्या ट्रॅक्टरला गण्यारपवारांची गाडी धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. यात आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर अतुल गण्यारपवार यांच्या मानेला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

गाडीच्या ड्रायव्हरला किरकोळ इजा झाली असल्याचे समजते. तर ट्रॅक्टरचालकालासुद्धा किरकोळ मार लागला. मात्र तो घटनास्थळावरून पळून गेला. अपघात झाल्यानंतर अतुल गण्यारपवार यांनी स्वतः अपघातग्रस्त गाडीतून उतरून ड्रायव्हरच्या साहाय्याने आनंद गण्यारपवार यांना बाहेर काढले व तिथून जाणाऱ्या एका भाजीपाल्याच्या वाहनाला थांबवून, त्यात त्यांना टाकून ब्रह्मपूरी येथील डॉ. पर्वते यांच्या इस्पितळात आणले. मात्र तत्पूर्वीच आनंद यांची प्राणज्योत मालवली होती. आनंद गण्यारपवार हे चामोर्शी येथील हसतमुख आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते.

Accident, Gadchiroli
गडचिरोली शहराच्या वेशीवर आले वाघ

आनंद गण्यारपवार यांच्या अवकाळी जाण्याने भाजपसह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. ब्रह्मपूरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शवविच्छेदनानंतर पार्थिव नातेवाइकांना सुपूर्द करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच ब्रह्मपूरीचे भाजप नेते माजी आमदार अतुल देशकर यांनी रुग्णालयात जाऊन आढावा घेतला. खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी आणि अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आनंद गण्यारपवार यांच्या अपघाती निधनानंतर तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com