Chandrapur : ..अन् तेव्हा आमदार जोरगेवार म्हणाले; गरज असली की विमान पाठवता, अन् आता ?

Jorgewar : गरिबाच्या लेकराले बोलू त द्या राजेहो...’, असे म्हणत त्यांनी सभागृहाचे लक्ष आकर्षित केले होते.
Kishor Jorgewar
Kishor JorgewarSarkarnama

MLA Kishor Jorgewar News : विधानसभेच्या सभागृहात बेधडक बोलण्यासाठी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार प्रसिद्ध आहेत. मागील अधिवेशनात, गरिबाच्या लेकराले बोलू त द्या राजेहो...’, असे म्हणत त्यांनी सभागृहाचे लक्ष आकर्षित केले होते. नागपुरात नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही आमदार जोरगेवार असे काही बोलले की, त्याची चित्रफीत अजूनही सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

हिवाळी अधिवेशनातही आमदार जोरगेवारांनी (Kishor Jorgewar) सत्ताधाऱ्यांना चांगलेच टोमणे मारले. मुळात त्यांनी शिंदे-फडणवीस (Devendra Fadanis) सरकारला पाठिंबा दिला आहे. पण अन्याय होत असल्यात ते तात्काळ चोख प्रत्युत्तर देतात. यावेळी ते चंद्रपूरमधील (Chandrapur) प्रश्‍न मांडण्यासाठी उभे झाले होते. काही मिनिटे बोलल्यानंतर बेल वाजली. तेव्हा ‘सत्ता स्थापन करताना आमदारांसाठी विमान पाठवता, अन् आता अधिवेशनात जिल्ह्याचे प्रश्‍न मांडतो आहे, तर बेल वाजवता. ये ना चालबे...’ असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या घेतल्या.

राज्य कसे आहे, हे त्या राज्यातील कायदा व सुव्यवस्था कशी आहे, यावर ठरत असते. जीडीपी, मानव विकास निर्देशांक किती आहे. जनता किती सुशिक्षित आणि अशिक्षित या बाबी नंतर येतात. सर्वप्रथम पाहिली जाते त्या राज्यातील कायदा व सुव्यवस्था. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बोकाळली होती. मी स्वतः ७ गाड्या पकडून दिल्या होत्या. नंतर सरकारने ती बाब गांभीर्याने घेत दारूबंदी उठवली. पण तेव्हा मोठ्या संख्येने गुन्हेगार तयार झाले. हेच गुन्हेगार आता एमडी ड्रग्ससारख्या व्यवसायात उतरले आहेत. ही नवीन गुन्हेगारी बोकाळत आहे. त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून ही गुन्हेगारी ठेचून काढणे गरजेचे आहे, असे आमदार जोरगेवार म्हणाले.

कोळशाची चोरी चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यावर आळा बसताना दिसत नाही. कारण येथे कायदा व सुव्यवस्था राखली जात नाही. हा औद्योगिक जिल्हा आहे. अजूनही उद्योग वाढ शकतात, पण गुन्हेगारीमुळे यायला धजत नाही. एमआयडीसीत १८८ भूखंड रिकामे आहेत. पण नवीन तरुण गेल्यास त्याला रित्या हाताने परत पाठवले जाते. दुसरीकडे आर्या नावाच्या कंपनीला रस्त्यावरील मोक्याची जागा दिली गेली. ही तफावत मिटल्याशिवाय जिल्ह्याचा विकास होणे नाही, असेही आमदार जोरगेवार यांनी सांगितले. त्यानंतर समृद्धी महामार्गाचा मुद्दा मांडत असताना, बेल वाजवण्याचा इशारा झाला. तेव्हा लगेच ‘सत्ता स्थापन करताना आमदारांसाठी विमान पाठवता, अन् आता अधिवेशनात जिल्ह्याचे प्रश्‍न मांडतो आहे, तर बेल वाजवता. ये ना चालबे...’, असे म्हणत त्यांनी लगेच संबंधितांचे कान टोचले.

Kishor Jorgewar
अजित दादा म्हणाले, आमदार किशोर जोरगेवार यांची ‘ती’ मागणी योग्यच !

तेव्हा दिले होते लॅपटॉप..

कोरोना काळात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सामूहिक अंतर पाळले जावे, याकरिता एका बेंचवर एका आमदारालाच बसविण्यात येत होते. तर उर्वरित आमदारांसाठी सभागृहातील गॅलरी येथील बेंचेस आरक्षित करण्यात आले होते. मात्र गॅलरीत बसणा-या आमदारांकडे लॅपटॉप न दिले गेल्याने सभागृहातील कामकाज पाहणे व ते समजणे अवघड झाले होते. त्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार चांगलेच संतापले होते. तेव्हा सभागृहाने याची दखल घेतली आणि दुसऱ्याच दिवशी गॅलरीत बसणा-या सर्व आमदारांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com