Anil Deshmukh News : नरखेड खरेदी विक्रीवर अनिल देशमुखांचे वर्चस्व, ठाकरे गटाचा अचानक पाठिंबा !

Nagpur : देशमुख यांना शह देण्यासाठी सर्व पक्षांनी ही निवडणूक एकत्रितपणे लढविली होती.
Anil Deshmukh with others.
Anil Deshmukh with others.Sarkarnama
Published on
Updated on

Election of Narkhed : गेल्या ४० वर्षांपासून अनिल देशमुख यांच्या ताब्यात असलेल्या नरखेड खरेदी विक्रीमध्ये अनिल देशमुख यांना शह देण्यासाठी सर्व पक्षांनी ही निवडणूक एकत्रितपणे लढविली होती. परंतु अनिल देशमुखांनी ११ पैकी आठ जागांवर दणदणीत विजय मिळविला. (Deshmukh won eight out of 11 seats)

या निवडणुकीत एक जागा ईश्वर चिठीत गेली. काल शुक्रवारी (ता. २३) झालेल्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे लीलाधर ठाकरे हे सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ओम खत्री हे उपसभापतिपदी निवडून आले.

मागील महिन्यात झालेल्या नरखेड खरेदी विक्रीच्या निवडणुकीत अनिल देशमुख यांना शह देण्यासाठी भाजपसह इतर सर्वच विरोध पक्ष व राष्ट्रवादीचा एक फुटीर गट एकत्र आले होते. तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ उमेदवार विजय झाले आणि देशमुखांनी येथील सत्ता एकहाती राखली.

लीलाधर ठाकरे, ओम खत्री, घनश्याम ठाकरे, रमेश आरघोडे, पांडुरंग नवरंग, कैलास गजबे, केशरबाई गाखरे, सुनिता बरडे हे विजयी झाले तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हिंमत नखाते, शरद काळे, केशव भिसे यांनी विजय मिळवला. अनिल देशमुखांना शह देण्यासाठी सर्व विरोध एकत्र येवून सुध्दा त्यांना विजय संपादीत करता आला नाही.

सभापती व उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येणार हे आधीच नक्की झाले होते. काल नरखेड येथे सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक घेण्यात आली. यात अनिल देशमुख कोणाला जबाबदारी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विजयी आठही उमेदवारांनी निवडीचे संपूर्ण अधिकार हे अनिल देशमुख यांच्याकडे दिले होते.

देशमुखांनी ठाकरे व खत्री यांच्या नावाची घोषणा करताच सर्वांनी त्याला सहमती दिली. यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने सुध्दा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु अध्यक्षपदाचा उमेदवार त्यांनी मागे घेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला.

उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे खत्री यांना आठ तर भिसे यांना तीन मते मिळाली. या निवडणुकीत नरखेड बाजार समितीचे सभापती सुरेश आरघोडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बंडोपंत उमरकर यांनी महत्वाची भूमिका बजावली.

या निवडणुकीत इतर पक्षांसोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी सुध्दा अनिल देशमुख यांच्या विरोधात ही निवडणूक लढविली होती. परंतु सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीत अचानक त्यांनी भरलेला फार्म मागे घेवून राष्ट्रवादीला (NCP) पाठिंबा दिला.

मागील काळात झाले ते झाले परंतु महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) व्रज्रमूठ आणखी घट करण्यासाठी यापुढे आपण सोबत राहू. असे निवडणुकीनंतर (Election) झालेल्या सभेत ठाकरे गटाचे नेते हिम्मत नखाते यांनी स्पष्ट केले. ठाकरे गटाने दिलेल्या अचानक पाठिंब्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com