Achalpur APMC Election: तिसऱ्या गटाची एन्ट्री, इच्छुकांच्या माघारीसाठी नेत्यांची कसरत !

Bachchu Kadu News: दोन पॅनल एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
Achalpur APMC
Achalpur APMCSarkarnama
Published on
Updated on

Amravati District's APMC Election News: अचलपूर बाजार समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख व आमदार बच्चू कडू यांचे दोन पॅनल एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. असे असताना बाजार समिती निवडणुकीत तिसऱ्या पॅनलची एन्ट्री झाली आहे. (The third panel has entered the election)

नुकतेच निवडणुकीच्या मैदानात उतरलेले तिसरे पॅनल हे अन्य पॅनलसाठी आव्हान ठरणार की, कुणाशी हातमिळवणी करणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. प्राप्त माहितीनुसार, अचलपूर बाजार समितीत टवलारकर गटाचे वर्चस्व राहिले आहे. यावेळी टवलारकर गट व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांचे संयुक्त पॅनल टाकले जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे माजी राज्यमंत्री (Minister of State) तथा विद्यमान आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) व टवलारकर गटाचे पारंपरिक विरोधक विजय काळे व अजय उभाड यांचे पॅनल आहे. या प्रमुख दोन पॅनलमध्ये थेट लढत होणार आहे. रयतचे संस्थापक अध्यक्ष राहुल कडू यांनी तिसरे पॅनल टाकले आहे.

हे पॅनल इतर पॅनलच्या काही उमेदवारांची गणिते बिघडवणार असल्याचे चित्र आहे. तिसरे पॅनल बाजार समितीच्या निवडणुकीत आव्हान उभे करणार की वेळेवर हातमिळवणी करणार, याबाबत सहकार क्षेत्रात चर्चा सुरू झाल्या आहेत.

Achalpur APMC
Arni APMC Election : कॉंग्रेसमध्ये वाढली इच्छुकांची गर्दी, महाविकास आघाडी तुटण्याचे संकेत !

दरम्यान बाजार समितीच्या निवडणुकीसाठी (APMC Election) १०६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांपैकी सात अर्ज अवैध झाले तर एकूण ९९ उमेदवाराचे अर्ज कायम आहेत. काल १८ एप्रिलपर्यंत पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.

आपले पॅनल सक्षम कसे होईल, यासाठी नेते मंडळी प्रयत्नशील असून काही जणांना माघार घेण्यासाठी त्यांची मनधरणी करत आहेत. उद्या कोण कोण नामांकन अर्ज माघारी घेतो, यावर निवडणुकीची (Election) दिशा ठरणार आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com