APMC Election : हिंगणघाटातही भाजप-कॉंग्रेस साथ-साथ; मागील वेळचे मित्र आता एकमेकांविरोधात !

Hinganghat : राजकीय पक्ष गटागटांत विखुरले आहेत.
Hinganghat APMC
Hinganghat APMCSarkarnama

Wardha District Hinganghat APMC News : हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या १८ जागांकरिता होणाऱ्या निवडणुकीत राजकीय पक्ष गटागटांत विखुरले आहेत. मागील निवडणुकीतील मित्र यावेळी एकमेकांविरोधात उभे आहेत. त्याचवेळी मागील निवडणुकीतील विरोधकांनी पक्षभेद विसरून दोस्तीचा हात पुढे केलेला आहे. (Forgetting party differences, the hand of friendship has been extended)

त्यामुळे ही निवडणूक राजकीय विरोधापेक्षा वैयक्तिक प्रतिष्ठेची होऊन दोन गटांत थेट होणार आहे. बाजार समितीचे विद्यमान सभापती ॲड. सुधीर कोठारी यांची मागील तीन दशकांपासून बाजार समितीवर एक हाती सत्ता आहे. त्यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास आघाडी या निवडणुकीत पुन्हा एकदा वर्चस्व कायम ठेवण्याच्या जिद्दीने मैदानात उतरली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजू तिमांडे, भाजपचे आमदार समीर कुणावार आणि कॉंग्रेस नेते रणजीत कांबळे हा बलाढ्य नेत्यांचा एक गट भाजप दुसरा एक गट, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि विद्यमान सभापती सुधीर कोठारी यांच्या सोबत थेट लढत देणार आहे. सुधीर कोठारी यांच्याकडून बाजार समितीची सत्ता खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप (समीर कुणावार) आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी कंबर कसली आहे.

या आघाडीत आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात भाजपचा (BJP) एक गट, आमदार रणजीत कांबळे यांचा कॉंग्रेसचा (Congress) गट असे समीकरण जुळल्याने शेतकरी विकास आघाडी ही बलाढ्य आघाडी झालेली आहे. त्याचवेळी या कोठारी गटाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकवेळचे सख्खे मित्र माजी आमदार राजू तिमांडे यांनी आपले दंड थोपटले आहे. या आघाडीला भाजपचा दुसरा गट आणि शिवसेना ठाकरे गट यांचे समर्थन आहे.

Hinganghat APMC
Wardha जिल्ह्यात कॉंग्रेसचा गढ पोखरून भाजपने जोडला नवा मतदार...

या समीकरणाने ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठा जोपासणारी नसून वैयक्तिक प्रतिष्ठा जोपासणारी ठरत आहे, कोठारी यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास आघाडीच्या व्यापारी व अडत्या मतदार संघातील दोन जागा अविरोध निवडून आलेल्या आहेत. आता १६ जागांकरिता थेट लढत होणार आहे. याकरिता ६४ उमेदवारी अर्ज दाखल झालेले असून छाननीत त्रुटीमुळे ५ अर्ज बाद झालेले आहे.

सद्यःस्थितीत ५९ उमेदवार रिंगणात आहेत. यातील कोठारी प्रणीत शेतकरी (Farmers) विकास आघाडीचे उमेदवार स्वभापचे राज्याध्यक्ष मधुसूदन हरणे यांचा अर्ज बाद झालेला आहे. त्यांनी आर्थिक दुर्बल गटात अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज बाद झाल्याने त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाद मागितली आहे. या प्रकरणात सुनावणी झालेली असून निर्णय येणे बाकी आहे. या निवडणुकीकडे (Election) सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com