APMC Election Bori : तीन झाले बिनविरोध, १५ जागांसाठी महाविकास आघाडीतच रंगतोय सामना !

Mahavikas Aghadi : आघाडी तसेच युतीबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
APMC Election Bori Arab
APMC Election Bori ArabSarkarnama

Yavatmal District APMC Elections : उमेदवारी अर्ज मागे घेण्याआधीच सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मतदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अजुनही आघाडी तसेच युतीबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. प्रमुख पक्षांनी स्वतंत्र अर्ज दाखल केले असल्याने आघाडीचे भीजत घोंगडे कायम आहे. (Subhash Thokal has remained in power single-handedly)

दारव्हा तालुका वगळता जिल्हात बोरी अरब बाजार समिती एकमेव आहे. दारव्हा तालुक्यात दारव्हा व बोरी अशा दोन स्वतंत्र बाजार समिती आहेत. बाजार समितीवर काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आजपर्यत राहीले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते सुभाष ठोकळ यांची एकहाती सत्ता राहीली आहे. बाजार समितीमधील व्यवहार बंद झाले आहे.

आजघडीला उत्पन्नाचे साधन बाजार समितीकडे नाही. अनेक वर्षे बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न कायम होता. परिणामी बाजार समितीवर प्रशासक होते. सध्या बाजार समितीकडे निधी आला आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. अपेक्षेप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीत उमेदवार उतरविले आहेत.

बाजार समिती निवडणुकीत व्यापारी अडते मतदारसंघ गटातून विवेक घुईखेडकर तसेच सुशील ठोकळ तर हमाल मापारी मतदारसंघातून दीपक गावंडे बिनविरोध निवडून आले आहेत. तीनही उमेदवार ठोकळ अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाशी संबंधित आहेत. उर्वरीत १५ जागांसाठी येत्या ३० एप्रिलला मतदान होणार आहे.

APMC Election Bori Arab
Arni APMC Election : कॉंग्रेसमध्ये वाढली इच्छुकांची गर्दी, महाविकास आघाडी तुटण्याचे संकेत !

काँग्रेस- (Congress) राष्ट्रवादी (NCP) व ठाकरे गट यांची आघाडी होईल, अशी शक्यता आहे. मात्र, अजुनही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी स्वतंत्र प्रचाराला सुरुवात केली आहे. बोरी अरब बाजार समितीमध्ये निवडणुकीत (APMC Elections) राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट निर्माण होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नवे राजकीय (Political) समीकरण उदयास येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com