Vidarbh News : अधीक्षक बऱ्हाटेंचा मनमानी कारभार : मृत माकडाचे दफन, अन् कृषी भवनात भजन-किर्तन!

Bhausaheb barhate : या ठिकाणी दगड ठेवून शेंदूर फासला गेला.
Bhausaheb barhate
Bhausaheb barhate Sarkarnama
Published on
Updated on

Bhausaheb barhate : रस्त्यावर अपघात होऊन दगावलेला माकड स्वतःच्या कार्यालयात आणून दफन केल्यानंतर, आता कृषी भवनात रात्री भजन-कीर्तनाचा गजर झाला. जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या या भन्नाट उपक्रमाची कार्यालयातील एकाही कर्मचाऱ्याला कल्पना नव्हती. कर्मचारी घरी गेल्यानंतर कृषी भवनात रात्री बऱ्हाटे एकटेच भजनात रमले होते.

स्वतःच्या श्रद्धा जोपासाव्यात. शासकीय नोकर म्हणून या श्रध्दा कार्यालयाचा उंबरठा ओलांडता काम नये. परंतु, बऱ्हाटे यांनी याच संकेतांना हरताळ फासण्याचे ठरविले आहे. कृषी भवन आणि त्या परिसराचा सातबारा आपल्याच नावावर आहे, अशी त्यांची वागणूक आहे. त्यांच्या या वर्तणुकीने कर्मचारीसुद्धा त्रस्त झाले आहे. काही दिवसांपूर्वीच रस्त्यावर मृत झालेले माकड त्यांनी शासकीय वाहनातून कार्यालयात आणले. वरोरा नाका उड्डाण पुलानजीकच्या कृषी भवनाच्या अगदी प्रवेशद्वारावरच त्याचा विधीवत दफनविधी केला.

या ठिकाणी दगड ठेवून शेंदूर फासला गेला. आता त्याला सिमेंट क्रॉक्रींटकरण केले आहे. माकडाला पुरताना त्यांनी कृषी विभागालासुद्धा अंधारात ठेवले. माकड पुरल्यामुळे झाडांना खत मिळते. त्यामुळे वन्यजीव मृत आढळले, तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील झाडाखाली पुरावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Bhausaheb barhate
Vidarbh Sahitya Sammelan : दर्दी नसेल तरी चालेल, गर्दी हवीच : उपस्थितीसाठी प्राचार्यांच्या फतव्यामुळे नवा वाद!

अनेक वन्यजीव संरक्षित यादीत आहे. या वन्यजीवांचा मृत्य झाल्यास वनविभागाला कळवावे लागते. यानंतर वनविभाग त्यांची विल्हेवाट लावतात. परंतु, कृषी अधीक्षक बऱ्हाटे यांनी शेतकऱ्यांनाच अडचणीत आणणारे आवाहन केले आहे. आता बऱ्हाटे यांनी शासकीय कार्यालयात रात्री भजन-कीर्तन सुरू केले. काल गुरवारी (दि.१५ डिसेंबर) रोजी कृषी भवनात भजन-कीर्तन ठेवले होते. याची कल्पना एकाही कर्मचाऱ्याला नव्हती. कर्मचारी घरी गेल्यानंतर भजनाचा कार्यक्रम सुरु झाला. प्रशासनाकडून याची परवानगीसुद्धा घेण्यात आली नव्हती. ध्वनिक्षेपक लावून भजनाचा लाभ वाटसरूंना घेता यावा याचीही व्यवस्था बऱ्हाटे यांनी केली. भजन मंडळी आणि बऱ्हाटे एवढेच रात्री अकरा वाजेपर्यंत कार्यालयात होते.

Bhausaheb barhate
Sushma Andhare यांच्या वक्तव्याविरोधात बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक; दिली थेट डोंबिवली बंदची हाक

या कार्यालयाच्या बाजूला खासगी वाहनतळ आहे.तिथे मुतारीची व्यवस्था केली आहे. त्याचे उद्घाटन झाले. त्यामुळे भजन ठेवले, असे बऱ्हाटे यांचे म्हणणे आहे. खासगी वाहनतळाची मुतारी आणि कृषी विभागाचा संबंध काय, यावर बऱ्हाटे यांनी मौन बाळगले. विशेष म्हणजे, मुतारी कृषी भवनाच्याबाहेर आहे. तिथे आज ताटवे लावण्याचे काम सुरु होते. मात्र, मुतारीच्या नावावरकृषी भवनात बऱ्हाटे यांनी भजनाची आवड पूर्ण करून घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com