Arvind Sawant : अरविंद सावंत भडकले; म्हणाले, आशिष शेलारांनी 'त्या' रात्री घेतली होती का?

Governor : राज्यपालांनी आपला पगार त्या निधीत का दिला.
Arvind Sawant and Ashish Shelar
Arvind Sawant and Ashish ShelarSarkarnama
Published on
Updated on

Arvind Sawant on Ashish Shelar : उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राज्यातील जनता ठाकरेंसोबत कडवटपणे उभी आहे आणि तसे चित्र दिसतंय. त्यामुळे आता आम्हाला बदनाम कसं करायचं, तर त्यासाठी निरनिराळ्या क्लुप्त्या लढवायच्या, असं त्यांचं चाललेलं आहे, असे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले.

शिवगर्जना यात्रेदरम्यान भंडारा येथे आले असता खासदार सावंत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले. ‘प्राईम मिनीस्टर केअर फंड’ कडे मी बारीक बघतोय. हा फंड म्हणजे नेमका काय आहे, याचे उत्तर आधी त्यांनी दिले पाहिजे. खासगी निधी म्हणून तुम्ही घेतला असेल, तर मग राज्यपालांनी आपला पगार त्या निधीत का दिला. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी का दिला. त्यामध्ये किती पैसा जमा झाला आहे, याची माहिती दिली तर बरे होईल.

अदानी ग्रुपच्या विषयावर भाजपवाले गप्प का आहेत, याचेही उत्तर त्यांनी दिले पाहिजे. गद्दार निघून गेल्यानंतर महाराष्ट्रातील जनता आमच्यासोबत भक्कमपणे उभी आहे. त्यामुळे ते बिथरले आहेत. दिल्लीत मनीष सिसोदिया यांनी दारूवाल्यांना खैरात दिली. त्याप्रमाणे महाराष्ट्रात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दारूवाल्यांना खैरात दिल्याच्या आरोप आशिष शेलार यांनी ट्वीटरवर केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार खासदार सावंत यांनी घेतला.

गेले अडीच वर्ष ते का गप्प होते आणि आत्ता ८ महिने शेलार का गप्प होते? आत्ताच त्यांना हा साक्षात्कार का झाला, असे सवाल करीत ते घाबरले आहेत. त्यामुळे काही ना काही आरोप करून उद्धव ठाकरे आणि एकूणच महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहेत. शेलारांनी ट्विट केले, तेव्हा त्यांनी घेतली होती का? असा प्रश्‍न करीत शेलारांचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

Arvind Sawant and Ashish Shelar
Arvind Sawant: '' पळालेल्या उंदरांनी आम्हांला...'', ठाकरे गटाच्या खासदाराचा केसरकरांवर हल्लाबोल

आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या ट्विटचा मी निषेध करतो. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची वाढती लोकप्रियता बघून पंढरी घाबरल्याने आशिष शेलार असे बोलत असल्याचेही खासदार सावंत (Arvin Sawant) म्हणाले. ठाकरेंना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून आशिष शेलार आणि त्यांच्या संपूर्ण टिमने कितीही प्रयत्न केले, तरी त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही, असे खासदार अरविंद सावंत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com