Arvind Sawant News : देवेंद्र फडणवीसांनी ‘त्या’ दुर्घटनेची जबाबदारी झटकली !

Akola : अरविंद सावंत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट घेतली.
Arvind Sawant and Devendra Fadanvis
Arvind Sawant and Devendra FadanvisSarkarnama

Devendra Fadnavis Ignore Akola District : बाळापूर तालुक्यातील पारस येथे बाबूजी मंदिरात आरती करणाऱ्या भाविकांच्या अंगावर झाड कोसळल्यामुळे सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार तथा विदर्भाचे संपर्कप्रमुख माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी केली.

बाळापूर तालुक्यात पारस येथे मंदिरामध्ये आरती सुरू असताना मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मंदिराच्या शेडवर झाड कोसळल्यामुळे सात भाविकांचा मृत्यू झाला. यांपैकी अनेक जण जखमी झाले. शिवसेनेचे खासदार तथा विदर्भाचे संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली.

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

पारस येथील दुर्दैवी घटना घडल्यानंतरही राज्यकर्त्यांनी केवळ भ्रमणध्वनीद्वारे शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचे अरविंद सावंत यावेळी म्हणाले. त्यांच्यासोबत जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रकाश शिरवाडकर, शहर प्रमुख (अकोला पश्चिम) राजेश मिश्रा, शहर प्रमुख (अकोला पूर्व) राहुल कराळे, अतुल पवनीकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Arvind Sawant and Devendra Fadanvis
Arvind Sawant on controversial statement : तो शब्द शरद पवारांचा नव्हे; तर माझा : अरविंद सावंतांनी वादावर टाकला पडदा

अमरावतीत येऊनही अकोल्याकडे फिरकले नाहीत..

शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अमरावती (Amravati) येथे पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सोमवारी उपस्थिती लावली होती.

येथून अवघ्या ९० किलोमीटरवर असलेल्या अकोला (Akola) जिल्ह्यातील शेतकरी व पारस दुर्घटनेतील जखमींची साधी विचारपूसही करण्यासाठी फडणवीस यांच्याकडे वेळ नव्हता का, असा प्रश्न खासदार सावंत (Arvind Sawant) यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com