Bhandara : एसपींनी व्हिडिओ वायरल करताच पोलिसांसह महसूल प्रशासनालाही फ़ुटला घाम !

स्वच्छ प्रतिमेचा पोलिस अधिकारी म्हणून लोहित मतानी यांना ओळखले जात. नागपूर शिस्त लावल्यानंतर आता भंडारा (Bhandara) जिल्ह्यात त्यांनी नियम मोडणाऱ्यांवर कारवाईच्या शिस्तीचा सपाटा लावला आहे.
Lohit Matani, Bhandara SP
Lohit Matani, Bhandara SPSarkarnama
Published on
Updated on

भंडारा : भंडारा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी स्वतः तयार केलेला व्हिडिओ सध्या जिल्ह्यात जोरदार वायरल झाला आहे. हा व्हिडिओ बघून पोलिस प्रशासनासह महसूल प्रशासनालाही चांगलाच घाम फ़ुटला आहे. यात लोहित मतानी यांनी जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे, त्यातल्या त्यात खासकरून वाळू तस्करांना (Sand Mafiya) चाप लावला आहे.

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असल्यास त्याचा व्हिडिओ अथवा केवळ माहिती स्वतःच्या व्हाट्सॲप नंबरवर पाठविण्याचे आवाहन केले आहे. त्यांचा हाच प्रयोग पोलीस (Police) प्रशासनासह महसूल प्रशासनाच्या जिव्हारी लागला असून मलाईतला घास हिसकावल्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली आहे. स्वच्छ प्रतिमेचा पोलिस अधिकारी म्हणून लोहित मतानी यांना ओळखले जात. नागपूर (Nagpur) जिल्ह्यात उपायुक्त असताना त्यांनी नागपूरला शिस्त लावली. आता भंडारा जिल्ह्यात आल्यावर त्यांनी नियम मोडणाऱ्यांवर कारवाईच्या शिस्तीचा सपाटा लावला आहे.

गोतस्कर, वाळू तस्कर, जुआ, सट्टा अशा अवैध धंदेवाल्यांसाठी तर ते कर्दनकाळ ठरत आहेत. जिल्ह्यात १००च्या वर गोतस्करी, दारू आणि वाळू तस्करांवर कारवाई झाली आहे. आता त्यांनी आपला मुख्य मोर्चा वाळू तस्करांवर वळविला आहे. हीच बाब भंडारा जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांसह महसुली अधिकाऱ्याला अडचणीची ठरली आहे. कारणही तसेच आहे भंडारा जिल्ह्यातील वाळूला पूर्व विदर्भात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे तस्करांची यावर नजर पडणे साहजिक आहे. यातही महत्वाची गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांना सोबत घेतल्याशिवाय तस्करांना ही बाब शक्य नाही. कमी वेळात गब्बर पैसा मिळत असल्याने अधिकाऱ्यांनाही नाही म्हणणे शक्य होत नाही.

Lohit Matani, Bhandara SP
कर्जतमध्ये पोलिसच निघाला वाळू तस्कर

सर्वजण एकजात हे काम मूकसंमतीने करत असतात. मात्र आता लोहित मतानी यांनी पोलिस अधीक्षकांचा चार्ज घेतल्यानंतर त्यांनी आवाहन करणारा व्हिडिओ वायरल केल्यानंतर मतानी वाळू तस्करीला जिल्ह्यात थारा देतील, असे वाटत नाही. त्यामुळे भंडारा पोलिसांचा ‘नो वे’ या वाक्यामुळे वाळू तस्करीला नकार मिळत असल्याने वाळू तस्कर पैसे गुंतवायला तयार होत नाहीत. त्यामुळेच महसूल अधिकाऱ्यांचे हात यावेळी रिकामेच राहणार आहेत. याशिवाय वाळू तस्करीला मदत करणारे अधिकारीसुद्धा मतानी यांच्या रडार वर आहेत. त्याच्या परिणाम म्हणून आता असे अधिकारी सुद्धा कंट्रोल रूमला पहायला मिळत आहेत.

दुसरीकडे बोगस रॉयल्टी तयार करणारे रॅकेटसुद्धा मतानी यांच्या रडार वर असून आता वाळू तस्करीत असलेल्या गुन्हेगारी क्षेत्रातील व्यक्तींवर मोक्का लावण्याची तयारी पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सुरू केली आहे. त्यामुळे तुमसरातील मोक्कात जामिनावर सुटलेला गुंड असो की पवनी, मोहाडी, लाखांदुरातील वाळू तस्कर असो, सगळ्यांना धक्का बसला आहे. लोहित मतानी यांनी जिल्हा स्वच्छ करण्याचा जो विडा उचलला आहे, त्याचे मात्र सामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com