Ashish Deshmukh : पक्षश्रेष्ठींनी नाना पटोले यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा...

Nana Patole : प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलले पाहिजे.
Balasaheb Thorat, nana patole and Ashish Deshmukh
Balasaheb Thorat, nana patole and Ashish DeshmukhSarkarnama

Controversy in Congress : बाळासाहेब थोरात माझ्याशी बोलत नाहीत, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सकाळीच सांगितले. थोरात जर त्यांच्याशी बोलत नसतील, तर प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलले पाहिजे, अन्यथा हा उद्रेक थांबणार नाही, असे कॉंग्रेसचे नेते डॉ. आशिष देशमुख आज ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

नाना पटोलेंमुळे जर पक्षातील निवडून येण्याची पात्रता असलेले तरुण नेते आणि ज्येष्ठ नेते पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत असतील, तर श्रेष्ठींनी आता पटोलेंचाच राजीनामा घेण्याची वेळ आली आहे आणि श्रेष्ठींनी हे काम तात्काळ केले पाहिजे. अन्यथा पक्षात राजीनामा सत्र सुरू झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीतीही डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली. ज्याप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आले, अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्षसुद्धा निवडला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Balasaheb Thorat, nana patole and Ashish Deshmukh
Ashish Deshmukh: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीवर डाॅ. आशिष देशमुख यांचा आक्षेप

पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी खऱ्या अर्थाने एकमेकांशी ‘हाथ से हाथ जोडो’ करावे. तोच धागा पकडून अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना मी पत्रही दिले होते. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्या बाबतीत जो काही प्रकार झाला. अगदी नाना पटोलेंच्याच भाषेत सांगायचे झाले तर हाय व्होल्टेज ड्रामा झाला. त्याचे कर्ते धर्ते नाना पटोले हेच होते. नवनिर्वाचित अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन तसे स्पष्टच सांगितलेले आहे.

महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये असलेले तरुण, तडफदार आणि ऐन उमेदीत असलेले जे नेते आहेत, त्यांना त्रास द्यायचा आणि कॉंग्रेसमधून बाहेर फेकायचे, हेच काम प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करीत तर नाही नाही, हा माझ्यासकट पक्षातील तरुण उमेदवारांसमोरचा प्रश्‍न आहे, असेही आशिष देशमुख म्हणाले. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि निष्ठावान नेत्यांनाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केवळ त्रास देण्याचेच काम केलेले आहे. त्यामुळे त्यांनाही अखेरीस टोकाची भूमिका घ्यावी लागली, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

पंजामध्येही नवज्योतसिंह सिद्धु, कॅप्टन अमरिंदर सिंह आणि चन्नी यांच्यामध्येही घोळ निर्माण झाला होता. त्या प्रश्‍नात वेळीच लक्ष घालण्यात आले नाही. परिणामी तेथे कॉंग्रेसला सत्ता गमवावी लागली होती. काहीशी तशीच परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण होऊ पाहते आहे. यातही वेळीच लक्ष न घातल्यास महाराष्ट्राचा पंजाब होण्यास वेळ लागणार नाही, अशीही भीती आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बदलण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.

नागपूर (Nagpur) विधान परिषद निवडणुकीत नाना पटोले (Nana Patole) हे आधी गंगाधर नाकाडे, त्यानंतर राजेश झाडे यांना उमेदवारी देण्याचा तयारीत होते. मात्र स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांचा सुधाकर आडबाले यांच्या उमेदवारीसाठी आग्रह होता. नाना पटोले मात्र आडबाले यांना उमेदवारी देण्यासाठी तयार नव्हते. त्यातूनच पटोले यांनी सुधाकर आडबाले यांना काँग्रेसकडून (Congress) एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे नाइलाजास्तव विदर्भातील नेत्यांना पत्रकार परिषद घेऊन आडबाले यांच्या उमेदवारीची घोषणा करावी लागली. शेवटी पटोले नव्हे, तर पत्रकार परिषद घेणाऱ्या नेत्यांचाच शब्द खरा ठरला आणि अडबाले निवडून आले.

गेल्या नागपूर विधान परिषद निवडणुकीतही नाना पटोले यांनी आरएसएसच्या छोटू भोयर यांना पक्षात आणून उमेदवारी दिली होती. मात्र ऐन निवडणुकीत छोटू भोयर पळून गेले होते. त्या प्रकरणी विदर्भातील नेत्यांनी याबाबत काही कारवाई झाली नसल्याची बाब पक्षश्रेष्ठी लक्षात आणून दिली आहे. अशा प्रकरणांमुळे नाना पटोले विदर्भात काँग्रेस पक्षाला अडचणीत आणत असल्याचा गंभीर आरोप डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com