Ashok Chavan : डॉ. परिणय फुके म्हणाले; अशोकराव आपल्यावर ‘त्यांचा’ विश्‍वास आहे, म्हणूनच...

Dr. Parinay Fuke : परिणय फुके यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांना हलके फुलके टोले लगावले.
Parinay Fuke, Ashok Chavan, Sunil Kedar, Babanrao Taywade and others.
Parinay Fuke, Ashok Chavan, Sunil Kedar, Babanrao Taywade and others.Sarkarnama
Published on
Updated on

Dr. Parinay Fuke News : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमात मंचावर सर्व कॉंग्रेसचे नेते होते. त्यामध्ये भाजपचे एकमेव डॉ. परिणय फुके होते. खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. पण यामध्येही परिणय फुके यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांना हलके फुलके टोले लगावले.

नागपूरनजीकच्या कोराडीजवळील महादुला येथे काल सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री आमदार सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, अनंतराव घारड, माजी मंत्री रमेश बंग, ओबीसी नेते अशोक जीवतोडे, डॉ. अक्षय काळे, गिरीष पांडव, बाळासाहेब कुळकर्णी, दिनानाथ पडोळे आणि भाजप नेते माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. फुके म्हणाले, या मंचावर सर्वच कॉंग्रेसचे नेते आहेत. भारतीय जनता पक्षाचा मी एकटाच आहे. कारण राजकारणाच्या पलीकडे जाऊन डॉ. बबनराव तायवाडे यांच्याशी माझा स्नेह आहे. त्यामुळेच राजकारण आणि पक्षभेद बाजूला ठेऊन मी येथे आलो आहे, असे सांगताना त्यांनी कॉंग्रेस नेत्यांना टोला लगावला. ते म्हणाले, अशोकराव (अशोक चव्हाण) (Ashok Chavan) आपल्यावर बबनरावांचा (Babanrao Taywade) प्रचंड विश्‍वास आहे. त्यामुळे तुम्ही आता त्यांचा विचार (आमदारकीसाठी) करायला हवा.

Parinay Fuke, Ashok Chavan, Sunil Kedar, Babanrao Taywade and others.
संजय राऊत यांचे फोटो पाहून आमदार परिणय फुके यांनी दिली खास उपाधी

बबनराव, मला असे वाटते की, कॉंग्रेसमध्ये राहून तुम्ही कधीच आमदार होऊ शकणार नाही. पण भाजपमध्ये या, असेही मी म्हणणार नाही. कारण पक्षविरहित भावनेने मी येथे आलो आहे आणि भाजपचा प्रचार करायला तर मुळीच आलो नाही. आमदार हे पद आपल्यासाठी फार लहान आहे.

राष्ट्रीय ओबीसी (OBC) महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच (Maharashtra) नव्हे तर देशभरात आपण ओबीसींची मोठी चळवळ उभी केली आहे. आपण केलेले काम आमदार किंवा इतर कोणत्याही पदापेक्षा मोठे आहे. त्यामुळे आपण या पदांपासून दूर गेले पाहिजे. राज्यातला यापुढील प्रत्येक मुख्यमंत्री तुमचा आशीर्वाद घ्यायला येथे येईल. असे परिणय फुके (Parinay Fuke) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com